शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी मागायला गेला अन् भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगसह एअरगन विसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 19:29 IST

आ. संजय केणेकर यांच्या कार्यालयात शस्त्र सापडल्याने गोंधळ; सायंकाळी साताऱ्यातून तरुण ताब्यात, क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेत कंत्राटी नोकरीसाठी आ. संजय केणेकर यांच्या कार्यालयात शिफारसपत्र मागायला गेेलेला तरुण बॅगसह त्यातील एअरगनही तेथेच विसरला. शनिवारी नेहमीप्रमाणे केणेकर यांचे सहकारी कार्यालयात गेल्यानंतर बॅग तपासल्यानंतर पिस्तूल पाहताच एकच हलकल्लोळ उडाला. दुपारी ही पिस्तूल नसून एअरगन असल्याचे समजले. सायंकाळी क्रांतीचौक पोलिसांनी रितेश संतोष होळकर (२३, रा. साईनगर, सातारा) याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

आ. केणेकर यांचे क्रांती चौकात कार्यालय आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे त्यांचे सहकारी, सुरक्षारक्षक व कार्यालयात काम करणारे कर्मचारी कार्यालयात पोहोचले. केणेकर यांच्या दालनाबाहेर काळ्या रंगाची एक बॅग पडलेली होती. कर्मचाऱ्याने ती उचलली. तेव्हा त्यात जड वस्तू असल्याने संशय बळावला. त्यांनी बॅग उघडताच त्यात पिस्तूलसदृश शस्त्र निघाले आणि सगळेच घाबरले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह क्रांतीचौक पोलिसांनी धाव घेतली.

वाटले पिस्तूल, निघाली एअरगनसुरुवातीला केणेकर यांच्या कार्यालयात पिस्तूल निघाल्याच्या चर्चेने सामाजिक, राजकीय क्षेत्रात एकच हलकल्लोळ उडाला. पोलिसांनी पिस्तूल ताब्यात घेतल्यानंतर तपासात ती एअरगन निघाली. भेट दिलेल्या तरुणाचा शाेध सुरू झाला. सायंकाळी ६ वाजता क्रांतीचौक पोलिसांनी रितेशची ओळख स्पष्ट करून त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले.

हौस महागात पडलीरितेश बी.एस्सी.च्या तृतीय वर्षात आहे. काही दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. महानगरपालिकेत कंत्राटी नोकरी मिळवण्यासाठी त्याला एकाने केणेकर यांचे शिफारसपत्र घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. तो शुक्रवारी सायंकाळी तेथे गेला. सहा महिन्यांपूर्वी त्याने ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून एअरगन हौस म्हणून खरेदी केली होती. क्रांती चौक पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अंमलदार संतोष मुदिराज अधिक तपास करत आहेत.

...तर कारवाई करावीसदर तरुण गुन्हेगारी वृत्तीचा असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी. प्रखर हिंदुत्वामुळे माझे विरोधक वाढले आहेत. त्यामुळे काळजी वाटते; पण त्याने केवळ हूडपणातून एअरगन बाळगली असेल तर त्याला त्रास होऊ नये, ही त्याच्या करिअरच्या काळजीपोटी इच्छा आहे.-संजय केणेकर, आमदार

English
हिंदी सारांश
Web Title : Job Seeker Forgets Airgun at BJP MLA's Office

Web Summary : A young man seeking a job recommendation at a BJP MLA's office in Chhatrapati Sambhajinagar mistakenly left behind his bag containing an airgun. Police apprehended him and filed charges after the discovery caused a stir.
टॅग्स :BJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी