शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले अन् सराफा दुकानात आग; लाखो रुपयांचे सोने-चांदी खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 19:44 IST

नातेवाइकाच्या मृत्यूचं दुःख अन् जळत्या दुकानाची आग; मुकुंदवाडीत एका व्यावसायिकावर कोसळली कुऱ्हाड.

छत्रपती संभाजीनगर : नातेवाइकाचे निधन झाल्याने दुकान बंद करून अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या सराफा व्यावसायिकाच्या दुकानाला आगीने वेढा घातला. गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजता मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडली. आगीत दुकानातील सर्व नोंदवह्या जळून खाक झाल्याने नुकसानीचा आकडा स्पष्ट झाला नाही. मात्र, लाखो रुपयांचे चांदी व सोन्याचे दागिने यात जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सुधीर बुऱ्हाडे यांचे मुकुंदवाडीतील मुख्य बाजारपेठेत विजय परमेश्वरी यांच्या इमारतीमध्ये सोने-चांदीच्या दागिन्यांचे खरेदी-विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी बुऱ्हाडे नेहमीप्रमाणे दुकानात उपस्थित होते. दुपारी त्यांच्या नातेवाइकाचे निधन झाल्याने साधारण दुपारी ३ वाजेच्या सुमारास बुऱ्हाडे दुकान बंद करून अंत्यसंस्कारासाठी गेले. ५ वाजेच्या सुमारास दुकानातून अचानक धूर येत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती कळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी चेतन तरोळे, सोमीनाथ भोसले, जवान अशोक वेलदवडे, विशाल निंबाळकर, माधव गाडे, किरण शेलार, नंदकुमार आरक, राजू राठोड, कृष्णा भागवत यांनी धाव घेतली. साधारण तासाभराच्या परिश्रमानंतर आग नियंत्रणात आली. मात्र, तोपर्यंत दुकानातील दागिने, फर्निचर, नोंदवह्या जळून खाक झाल्या.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा सेटअप बदललासर्वाधिक आग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या डीव्हीआरजवळ आढळून आली. बुऱ्हाडे यांनी दाेन दिवसांपूर्वी दुकानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा सेटअप बदलला होता. यात वायरिंगचाही समावेश होता. तेथेच शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डागडुजी, दुरुस्तीसाठी काही ग्राहकांचे सोने दुकानात होते. चांदीचे दागिने अधिक होते. आगीत नोंदवह्या, बिले जळून खाक झाल्याने नुकसानीचा आकडा सांगता येणार नाही, असे बुऱ्हाडे यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Funeral Visit Turns to Tragedy: Fire Engulfs Jewelry Store

Web Summary : A jewelry store owner attending a relative's funeral returned to find his shop engulfed in flames. The fire, suspected to be caused by a short circuit near the CCTV system, destroyed gold, silver, furniture, and records, resulting in losses estimated in lakhs.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर