थकवा घालविण्यासाठी तलावात आंघोळीला गेले अन अनर्थ झाला; पाच मजूर तरुणांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 20:14 IST2020-07-31T20:09:44+5:302020-07-31T20:14:13+5:30

सर्व मृत हे भालगाव ता.औरंगाबाद येथील तीन परिवारातील सतरा-अठरा वर्ष वयोगटातील आहेत.

Went to bath in the pool and was devastated; Five young laborers drowned | थकवा घालविण्यासाठी तलावात आंघोळीला गेले अन अनर्थ झाला; पाच मजूर तरुणांचा बुडून मृत्यू

थकवा घालविण्यासाठी तलावात आंघोळीला गेले अन अनर्थ झाला; पाच मजूर तरुणांचा बुडून मृत्यू

ठळक मुद्देकोबी काढण्याचे काम आटोपून घरी निघाली होती तरुण

करमाड : मजुरीवर कोबी काढून दिल्यानंतर घरी परतत असताना वाटेत दिसलेल्या तलावात आंघोळ करण्यासाठी उतरलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास नाथनगर शिवारातील पाझर तलावात घडली. सर्व मृत हे भालगाव ता.औरंगाबाद येथील तीन परिवारातील सतरा-अठरा वर्ष वयोगटातील आहेत. त्यातील तिघे हे सख्खे बंधू होते.

मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भालगाव येथील नऊ तरुण मिळेल ती काम करत होती. त्यांना वरझडी शिवारात कोबी काढण्याचे काम मिळाले होते. हे काम दुपारी आटोपून सर्वजन तलावाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागली.

यातच कोणालाच पोहता येत नसल्याने पाचजणांचा बुडून मृत्यू झाला. तर चार जन वाचले आहेत. मृतांची नावे आतीक युसुफ शेख (१८) , तालेब युसुफ शेख (२१) व सोहेल युसुफ शेख (१६) हे तीन सख्खे भाऊ तर समीर शेख मुबारक शेख (१७) , शेख अन्सार शेख सत्तारा (१७) अशी आहेत.  

Web Title: Went to bath in the pool and was devastated; Five young laborers drowned