महालक्ष्मीचे थाटामाटात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:17 IST2017-08-30T00:17:11+5:302017-08-30T00:17:11+5:30

सर्वांच्या लाडक्या गणरायापाठोपाठ मंगळवारी गौराईचे आगमन झाले. ठिकठिकाणी गौराईची वेगवेगळी रूपे बघावयास मिळतात. काही ठिकाणी तिला गणेशाची आई मानतात, तर काही ठिकाणी बहीण, गौराईचे आगमन पूजन आणि विसर्जन विविध भागाप्रमाणे बदलत जाते. प्रत्येक समाज आपआपल्या पारंपरिक पद्धतीने गौराईचा उत्सव साजरा करतो. बहुतांश भागात तीन दिवसांची माहेरवाशीण म्हणून गौराईचे थाटामाटाने स्वागत करण्यात येते.

 Welcome to Mahalakshmi | महालक्ष्मीचे थाटामाटात स्वागत

महालक्ष्मीचे थाटामाटात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सर्वांच्या लाडक्या गणरायापाठोपाठ मंगळवारी गौराईचे आगमन झाले. ठिकठिकाणी गौराईची वेगवेगळी रूपे बघावयास मिळतात. काही ठिकाणी तिला गणेशाची आई मानतात, तर काही ठिकाणी बहीण, गौराईचे आगमन पूजन आणि विसर्जन विविध भागाप्रमाणे बदलत जाते. प्रत्येक समाज आपआपल्या पारंपरिक पद्धतीने गौराईचा उत्सव साजरा करतो. बहुतांश भागात तीन दिवसांची माहेरवाशीण म्हणून गौराईचे थाटामाटाने स्वागत करण्यात येते.
काही ठिकाणी गौराई पाटावर तर काही ठिकाणी उभ्या गौरी, काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या आणि खड्याच्या गौरी असतात. दरम्यान, आपली गौराई सर्वाधिक चांगली दिसावी म्हणून साड्यांपासून दागिन्यांपर्यंत खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठेत गर्दी होत दिसून येत आहे.
गौराईच्या आगमनाने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे. रात्रभर जागरण, गौरीचे गाणे, हळदी, कुंकू समारंभ अशा विविध कार्यक्रत आणि भक्तीमय वातावरणात गौराईचा हा सण घरोघरी उत्साहात साजरा केला जात आहे.
फळांचे भाव मात्र ‘जैसे थे’
ऐन सणासुदीच्या काळात मात्र फळांचे भाव मात्र ‘जैसे थे’ असल्याचे दिसून आले. शहरातील फळ बाजारपेठेत सफरचंद ८० ते १४० रू. किलो, केळी- ३० रू. डझन, डाळिंब- ६० रूपये किलो दराने विक्री केले जात आहे.
विशेष म्हणजे सध्या फळ बाजारात सफरचंदचे दर पूर्वीपेक्षा कमी झाले आहेत. पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारात शहरासह ग्रामीण भागातील महिलांची गर्दी दिसून आली.

Web Title:  Welcome to Mahalakshmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.