शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्र करणार कन्या जन्माचे स्वागत

By admin | Updated: July 27, 2014 01:14 IST

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची बैठक २५ जुलै रोजी झाली.

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची बैठक २५ जुलै रोजी झाली. या बैठकीत केंद्रामध्ये जन्मणाऱ्या कन्येला कपडे व अन्य उपयोगी साहित्य देऊन स्वागत करण्याचा ठराव घेण्यात आला. बैठकीला समिती अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या पार्वती घोडके, सदस्य काशिनाथ बंडगर, पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, सरपंच शशिकला शेटे, बाबई चव्हाण, डॉ. सचिन यतनाळकर, सत्यशिला चव्हाण, धनराज मुळे, प्रबोध कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.समितीच्या बैठकीला सुरूवात होताच उपस्थितांनी औषधांचा तुटवडा भासत असल्याची ओरड केली. त्यामुळे रूग्णांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत असल्याचेही नमूद केले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जन्मणाऱ्या कन्यांचे स्वागत करण्याचा ठराव घेण्यात आला. मुलीसाठी कपडे आणि उपयोगी पडणारे साहित्य देण्याचे ठरले. आशा कार्यकर्त्यांनाही काही कामासाठी मानधन दिले जात नाही. अशावेळी रूग्ण कल्याण समितीच्या उपलब्ध निधीतून मानधन देण्याचे ठरले. बैठकीला मुख्याध्यापिका नवल गोवे, निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक चिंचोले, आशा समुह संघटक साळुंके यांच्यासह आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)