शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये गजानन महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

By admin | Updated: July 20, 2014 00:03 IST

बीड: पंढरपूरहून शेगावकडे परतणाऱ्या गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी सकाळी बीडमध्ये आगमन झाले.

कोल्हापूर : गांधीनगर येथील रि.स.नंबर २६३६ या सरकारी जागेबाबत कोल्हापूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाला पुणे विभागीय अप्पर आयुक्तशाम देशपांडे यांनी यापूर्वी दिलेली स्थगिती आज, शनिवारी कायम केली. आज सकाळी कोल्हापुरात ही सुनावणी झाली. याप्रकरणी आता ६ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.शहरालगत असलेल्या गांधीनगर येथील रि.स. नंबर २६३६ या ५७.१६ आर., पैकी सरकारी जमिनीवर ५१ व्यापारी व दुकानदार असलेल्या मिळकत धारकांनी अतिक्रमण केले होते. त्याबाबत काहीजणांनी तक्रारी केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढून ती सरकारी हक्कात घ्यावी, असे आदेश दिले होते. त्यानंतर २४ आॅगस्ट २०१२ रोजी या जमिनीवर उभारलेली ३६ दुकाने सील केली होती. या कारवाईच्या विरोधात तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्याकडे अपील करण्यात आले होते. तेथे त्यांनीही जमीन सरकारी हक्कात घेण्याचा आदेश कायम केला होता.विभागीय आयुक्तांच्या विरोधात महसूलमंत्री थोरात यांच्याकडे अपील केले गेले. त्यामुळे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे हे प्रकरण पुनर्विचारार्थ पाठविण्यात आले. तेव्हा अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी आपल्या अधिकारात गांधीनगर येथील या जमिनीवरील बांधकाम ठरावीक रक्कम भरून घेऊन नियमित करून देण्यात यावीत, असा आदेश दिला होता. सुमारे एक एकर ३३ गुंठे ही जमीन केवळ ७५ हजार रुपये भरून घेण्याचे आदेश पवार यांनी दिले होते. त्याच्या विरोधात ४ जुलैला हिरालाल केशव गळीयल (रा. गांधीनगर) व कोल्हापुरातील प्रजासत्ताक संघटनेने विभागीय अप्पर आयुक्तांकडे अपील केले होते. यानुसार ७ जुलैला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. ती आजच्या सुनावणीवेळी कायम करण्यात आली. साथीच्या आजार रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरजसीपीआर ,महापालिका,जिल्हा परिषद प्रशासनावर जबाबदारीकोल्हापूर : डेंग्यू , काविळ, मलेरिया या साथीच्या आजाराचे रुग्ण दगावल्यानंतरच जिल्हा प्रशासन जागे होते, हे आजपर्यंतचे चित्र आहे. काल (शुक्रवारी) हेर्ले (ता.हातकणंगले) येथील बालिकेचा डेंग्युसदृश्य आजाराने मृत्यु झाला. विशेषत : पावसाळ्यात या साथीचे आजार डोके वर काढतात. या आजारांना पायबंद घालण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) प्रशासनाने महत्वाची जबाबदारी उचलावी.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रुग्णालयात अशा आजारांचा रुग्ण आला तर त्यावर तत्काळ उपचार करावे अशा सक्त सुचना वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचनासीपीआर प्रशासनाच्या अखत्यारित चार कोडोली, गडहिंग्लज, सेवा रुग्णालय (लाईन बाजार) व जयसिंगपूर ही उपजिल्हा रुग्णालये तर १६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असे एकूण २० रुग्णालये येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांना साथीच्या आजाराचे रोज किती रुग्ण दाखल झाले, याची माहिती द्यावी, अशा सक्त सुचना जिल्हाशल्यचिकित्सकांनी यांनी दिल्या आहेत.साथीच्या आजाराने डोकेवर काढल्याने महापालिका प्रशासन सतर्क राहिले आहे.शहरातील कोणत्याही खासगी रुग्णालयात डेंग्यु,मलेरिया व काविळ या आजाराची लागण झाल्यास तत्काळ कळवावे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी औषध फवारणी,गटारी स्वच्छ करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.