शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

लग्नापूर्वी नवरदेवाने ठोकली धूम

By admin | Updated: May 21, 2014 00:47 IST

हदगांव:तालुक्यातील पिंपरखेड येथे १९ मे रोजी पाच सामूहिक लग्न होते़ त्यापैकी एका नवरदेवाने लग्नापूर्वीच पलायन केल्यामुळे नातेवाईकांची फजिती झाली़

 हदगांव:तालुक्यातील पिंपरखेड येथे १९ मे रोजी पाच सामूहिक लग्न होते़ त्यापैकी एका नवरदेवाने लग्नापूर्वीच पलायन केल्यामुळे नातेवाईकांची फजिती झाली़ माजी जि़ प़ सदस्य डिगांबर साखरे, तानाजी पाटील यांनी गावात धनगर समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता़ पाच लग्नही ठरले़ सहा महिन्यापूर्वीच समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे तानू वामनराव काळे (रा़ पिंपरखेड, ता़ हदगाव) व पांडुरंग वारकड (रा़ सारंगी, ता़ पूर्णा) यांचा विवाह ठरला़ लग्नाची तयारी झाली़ कपडेलत्ते खरेदी केले़ पत्रिकाही वाटप झाल्या़ सोयरे-धायरे जमा झाले़ नवरीला हळद लागली़ १८ मे रोजी नवरदेवाला आणण्यासाठी वधूच्या नातेवाईकांनी गाडी पाठविली़ परंतु नवरदेव दवाखान्यात असल्याचे सांगितले़ तिथे रात्रभर गाडी थांबली़ परंतु नवरदेव पसार झाला होता़ ही बातमी वार्‍यासारखी पसरली़ नवरीच्या घरची मंडळीही चिंताग्रस्त झाली़ मंगलमय वातावरणावर विरजणच पडले होते़ याच लग्नासाठी अर्धापूर येथून आलेले राम सरोदे व त्यांची पत्नी यांनी वधूच्या पित्याला भेटून आमच्याकडे एक मुलगा आहे, त्याला बघून घ्या असे सांगितले़ मुलीच्या वडिलांनी अर्धापूर येथे येवून मुलगा बघितला़ त्याला संपूर्ण कहाणी सांगितली़ रोहिदास खोब्राजी साखरे असे मुलाचे नाव असून तो विनाअट विवाहाला तयार झाला़ ठरल्याप्रमाणे त्याच मंडपात विवाह पार पडला़ एकीकडे सर्व रितीप्रमाणे सोयरिक होवून व तीन-चार तोळे सोनं, ३ लाख हुंडा देवूनही ऐनवेळी नवरदेव पसार झाला़ तर दुसरीकडे सामाजिक भान ठेवत कुटुंब कोलमडून पडले असता त्यांना आधार देवून समाजात एक आदर्श निर्माण करण्याचे काम या युवकाने केला आहे़ दरम्यान, याप्रकरणी पळून गेलेल्या नवरदेव पांडुरंग वारकड याच्याविरूद्ध पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती डिगांबर साखरे या नातेवाईकाने दिली़ (वार्ताहर)