शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवाराने शेततळे, बंधारे तुडुंब

By admin | Updated: August 1, 2016 00:07 IST

शासनाचे जलयुक्तशिवार अभियान शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत

विहिरींची पातळी वाढली : मोहाडी तालुक्यातील शेतीला संजीवनी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर फुलले समाधान भंडारा : शासनाचे जलयुक्तशिवार अभियान शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोहाडी तालुक्यातील पहिल्या टप्प्यात १५ गावांचा समावेश करण्यात आला. या गावात सर्व यंत्रणांनी मिळून शेततळे, सिमेंटनाला बांध, नाला खोलीकरण, मजगी, साठवण तलाव दुरुस्ती, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती, बोडी नूतनीकरण व भातखाचरे पुनर्जीवन अशी २४३ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानात पूर्ण झालेल्या कामात पाणी साठले असून याचा वापर शेतकरी धान पिकासाठी करत आहे. मोहाडी तालुक्यात या मोसमात जलयुक्त शिवारच्या कामात १७०० टिसीएम पाणीसाठा झाला असून याद्वारे १७०० हेक्टर संरक्षित सिंचन होणे अपेक्षित आहे. २०१५-१६ मध्ये करडी, मोहगाव, बोरी, बच्छेरा, उसर्रा, टांगा, देव्हाडा, नरसिंहटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव, कांद्री, शिवनी व खैरलांजी या गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे. मोहाडी तालुक्यात नालाबांध व शेततळे तुडूंब भरले असून विहिरीच्या पातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानात शेततळे ३१, सिमेंट नालाबांध १९, नाला खोलीकरण ५५, सिमेंट नालाबांध दुरुस्ती १७, मजगी १८ (३५ हेक्टर), साठवण तलाव १३, बोडी नूतनीकरण ७, भातखाचरे पुनर्जीवन ८२ (१२४ हेक्टर) अशी एकूण २४३ कामे पूर्ण झाली आहेत. झालेल्या कामात १७०० टीसीएम पाणी साठले असून या पाण्यावर १७०० हेक्टर संरक्षित सिंचन होणार आहे. जलयुक्त शिवारामुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात आले असून त्याचा वापर सिंचनासाठी होत आहे. धान रोवणीसाठी या पाण्याचा वापर केला आहे. पावसाने सरासरी गाठली नसल्याने शेतकऱ्यांच्या मदतीला जलयुक्त शिवारच्या कामातील साठलेले पाणी धावून येत आाहे. (शहर प्रतिनिधी) मोहाडी तालुक्यात १०८ गावे असून त्यापैकी १५ गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे. अडलेल्या पाण्याचा शेतकरी सिंचनासाठी वापर करीत आहेत. बांध व शेततळ्यात साठलेले पाणी धानासाठी संजीवन ठरत आहे. सोबतच विहिरीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात १० गावांची निवड झाली असून या ठिकाणी कामे सुरु आहेत. - आर.जे. पात्रीकर तालुका कृषी अधिकारी, मोहाडी