शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

पाणीपुरवठ्याचे शटडाऊन १२ नव्हे, ८ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:07 AM

औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा २४ तास सुरळीत राहावा या उदात्त हेतूने जायकवाडीत २८ जून रोजी देखभाल दुरुस्तीसह ‘रिंग मेन ...

ठळक मुद्देमहावितरण : २८ जून रोजी दिवसभर दुरुस्तीची कामे

औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा २४ तास सुरळीत राहावा या उदात्त हेतूने जायकवाडीत २८ जून रोजी देखभाल दुरुस्तीसह ‘रिंग मेन युनिट’ बसविण्यात येणार आहे. या कामासाठी वीज कंपनीने महापालिकेला शटडाऊन मागितले होते. अवघ्या ८ तासांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. महापालिकेने १२ तास शटडाऊन घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. महावितरणबरोबरच महानगरपालिकाही या काळात आपली दुरुस्तीची कामे करणार आहे.महापालिकेच्या जायकवाडी व फारोळा येथील पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महावितरणने गेल्या सहा महिन्यांपासून शटडाऊन घेतलेले नाही. या काळात विद्युत वाहिन्यांच्या लगत असणाºया झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत. त्या तोडण्याचे काम शटडाऊनदरम्यान करण्यात येणार आहे, तसेच विद्युत वाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीची इतर कामेही शुक्रवार, दि.२८ जून रोजी करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी महावितरणच्या वतीने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यासाठी आरएमयू (रिंग मेन युनिट) बसविण्यात येणार आहे. महावितरणला १२ तासांचे शटडाऊन घेण्याची मुदत दिल्याचे महानगरपालिकेने जाहीर केले असले तरी २८ जूनला प्रत्यक्षात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुरुस्तीसह आरएमयूचे काम करण्यात येणार आहे. शटडाऊनच्या काळात स्वत:चीही दुरुस्तीची कामे करणार असल्याचे महानगरपालिकेने महावितरणला कळवले आहे.नागरिकांनी पाणी साठवून ठेवावेशुक्रवार, दि.२८ जून रोजी जायकवाडी, फारोळा येथील पाणीपुरवठ्याची यंत्रणा तब्बल १२ तास बंद राहणार आहे. शुक्रवारी शहरात कुठेच पाणीपुरवठा होणार नाही. मध्यरात्री जायकवाडीहून पाणी आल्यास शनिवारी काही वसाहतींना पाणी देण्यात येईल. मनपाने यापूर्वी शहराचा पाणीपुरवठा २९ जून रोजी एक दिवसासाठी पुढे ढकलला नाही. शटडाऊनमुळे शहराला किमान दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागेल. नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.फ्लोटिंग पंपात गवत, शेवाळजायकवाडी धरणातून शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील काही दिवसांपासून आपत्कालीन फ्लोटिंग पंपातही गवत आणि शेवाळ अडकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वारंवार हे शेवाळ व गवत काढण्यासाठी कर्मचाºयांना रात्रभर सतर्क राहावे लागत आहे. दुसरीकडे उपसा घटत असल्याने सिडको-हडकोतील जलकुंभ पूर्णपणे भरत नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीmahavitaranमहावितरण