शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

जायकवाडीतील जलसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 20:30 IST

जायकवाडी धरणातील जलसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल, असा ठाम विश्वास जायकवाडीचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केला.... २२ मार्च रोजी एकीकडे जागतिक जल दिन साजरा झाला. अगदी त्याच दिवशी दुसरीकडे जायकवाडीची जलपातळी मृतसाठ्यात गेली.

- संजय जाधवलोकमत न्यू्ज नेटवर्क२२ मार्च ते २७ एप्रिलदरम्यान मृतसाठ्यातील  ६९.५१५ दलघमी पाण्याचा जलाशयातून उपसा झालेला आहे. मृतसाठ्यात ६६८.५९१ दलघमी जलसाठा शिल्लक असून, यात अंदाजे ३० टक्के गाळ असल्याने उन्हाळाभर पाणी पुरेल, असे नियोजन लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाने केले आहे. जायकवाडी धरणातील जलसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल, असा ठाम विश्वास जायकवाडीचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केला....  

प्रश्न : जायकवाडी धरणात आज रोजी किती जलसाठा शिल्लक आहे? उत्तर : जायकवाडी धरणात जिवंत साठा निरंक असून, मृतसाठ्यात ६६८.५९ दलघमी म्हणजे २५.८१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण मृतसाठ्यामध्ये अंदाजे ३० टक्के गाळ आहे. 

प्रश्न : जायकवाडी धरणातून कोणत्या शहरांना पाणीपुरवठा केला जातो?उत्तर : जायकवाडी जलाशयातून औरंगाबाद, जालना या मोठ्या शहरांसह पैठण, गंगापूर, शेवगाव व पाथर्डी या नगर परिषद तसेच २५० पेक्षा अधिक गावांना पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास उद्योगासाठी जो पाणीपुरवठा केला जातो, त्यातील ४० टक्के भाग हा पिण्याचा पाण्याचा आहे. एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यातून सध्या ग्रामीण पाणीपुरवठ्याचे टँकर भरले जातात. 

प्रश्न : ३० टक्के गाळ, वाढलेले बाष्पीभवन लक्षात घेता जायकवाडीचा जलसाठा किती दिवस पुरेल?उत्तर : मृतसाठ्यातील पाणी जुलैअखेरपर्यंत पुरेल, असे नियोजन आहे. जायकवाडी धरणामध्ये १९७६ पासून पाणीसाठा होत आहे. त्यामुळे धरणात गाळ साचणे हे नैसर्गिक आहे. सध्या दररोज सरासरी १ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे, असे असले तरी औरंगाबाद, जालना व इतर पाणीपुरवठा योजनांना सुरळीतपणे पाणी पुरेल. 

प्रश्न : जायक वाडी धरणातील पाण्याची शास्त्रोक्त पद्धतीने तपासणी क रण्यात येते का?उत्तर : जलविज्ञान प्रक ल्प विभागातर्फे धरणातील पाण्याची नियमित तपासणी क रण्यात येते, नियमितपणेपाण्याचेनमुने जलविज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. 

प्रश्न : जायक वाडी धरणाच्या वर्षाला सरासरी ११ टीएमसी पाण्याचा अपव्यय बाष्पीभवन प्रक्रियेनेहोतो. बाष्पीभवन व्यय कमी क रण्यासाठी काय उपाययोजना आहेत? उत्तर : जायक वाडीसारख्या मोठ्या धरणांच्या बाबतीत सुयोग्य सिंचन व्यवस्थापन हेच बाष्पीभवन कमी करण्याची उपाययोजना आहे. सध्या तरी दुसरा क ोणता उपाय यावर नाही. 

प्रश्न : समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार १५ ऑक्टोबरनंतर निर्णय घेतला जातो, या दीर्घ कालावधीत उर्ध्व भागात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या प्रकाराने जायक वाडीचे पाणी आधीच वळविण्यात येते, याबाबत आपलेकाय मत आहे?उत्तर : मा. उच्च न्यायालय मुंबईव मा. सर्वोच्च न्यायालयाने समन्यायी पाणी वाटप पद्धती मान्य केलेली आहे. यामुळे याबाबत कुठलेही मत व्यक्त क रणेउचित ठरणार नाही.  

प्रश्न : पक्षी अभयारण्य घोषित झाल्याने काही अडचणी निर्माण झाल्या आहेत का? उत्तर : धरणाचे संपूर्णबुडीत क्षेत्र संरक्षित पक्षी अभयारण्य व पूर्ण संचय पातळीपासून पाचशे मीटरपर्यंत इको सेन्सिटिव्ह झोन घोषित झालेला असल्यामुळेधरणातून गाळ काढायचा असल्यास वनखात्याची परवानगी घ्यावी लागते. यामुळे धरणातील गाळ काढता येईल, ही शक्यता धूसर झाली आहे. 

प्रश्न : जायक वाडी प्रक ल्पाचेगाळ सर्वेक्षण केव्हा क रण्यात आले?उत्तर : महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) नाशिक मार्फत २०१४ मध्ये जायक वाडी जलाशयातील गाळाचेसर्वेक्षण करण्यात आले. उपयुक्त जलसाठ्यात ८.२४ टक्के, तर मृतसाठ्यात ३० टक्के गाळ असल्याचा अहवाल या संस्थेनेदिला आहे. 

प्रश्न : सिंचन व्यवस्थापनात सध्या काय अडचणी आहेत? उत्तर : लाभक्षेत्र विकास प्राधिक रणांतर्गत २३९० मंजूर पदे आहेत, त्यापैकी ८९० म्हणजेच केवळ ३७ टक्के कार्यरत आहेत. १५०० पदेरिक्त आहेत. सिंचन व्यवस्थेशी संबंधित कालवा निरीक्षकांची पदेमोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने मनुष्यबळाची मोठी अडचण सिंचन व्यवस्थापनात निर्माण झाली आहे.राजकीय दबावापोटी जास्त पाणी सोडले का?राजकीय दबावापोटी पाणी सोडले हेही खरे नाही की, जास्तीचे पाणी सोडले हेही खरे नाही. कालवा सल्लागार समितीने मंजूर केलेलेच रोटेशन सोडण्यात आले. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे खरीप हंगामात कालव्यांना पाणी सोडावे लागले. उर्ध्व भागातील पावसाचे प्रमाणही जेमतेम असल्यामुळे यंदा धरणातील पाणीसाठा पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे रबी हंगामात दोनच पाणी पाळ्या होऊ शकल्या. जायकवाडीचे पाणी मिळाल्याने लाभक्षेत्रात दुष्काळ जाणवला नाही. कोणाच्या दबावामुळे पाणी सोडले नसून आवश्यकतेप्रमाणे रीतसर कालवा सल्लागार समितीची मंजुरी घेऊनच पाणी सोडले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई