शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

छत्रपती संभाजीनगरात १२ दिवसांनंतर पाणीपुरवठा; खंडपीठाची तीव्र नापसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:00 IST

शहरवासीयांना वेळेवर पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्या, खंडपीठाने दिले निर्देश

छत्रपती संभाजीनगर : सध्या तीव्र उन्हाळ्याच्या काळात शहरवासीयांना १० ते १२ दिवसांनंतर होत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. अश्विन भोबे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. शहरवासीयांना वेळेवर पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्या, असे निर्देश खंडपीठाने बुधवारी महानगरपालिकेला दिले.

काही भागांत ७ दिवसांनंतर तर काही भागांत ८ दिवसांनंतर पाणीपुरवठा करण्यात येतो, असे निवेदन ‘मनपा’तर्फे ॲड. संभाजी टोपे यांनी केले. त्यांचा दावा फोल ठरवत न्यायालयाचे मित्र ॲड. सचिन देशमुख आणि मूळ याचिकाकर्ता ॲड. अमित मुखेडकर यांनी १० ते १२ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

रोडमॅप सादरउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘जीव्हीपीआर’ कंपनीने शहर पाणीपुरवठा योजनेचा ‘रोडमॅप’ सादर केला. पाणीपुरवठा योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी खंडपीठातर्फे नेमलेल्या समितीने ‘रोडमॅप’वर चर्चा करून आपले अभिप्राय पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

तक्रारीच्या अनुषंगाने कारवाईखंडपीठाच्या आदेशानुसार पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड खंडपीठात हजर होते. एमजेपी आणि कंत्राटदार यांंच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली आणि प्रतिबंधात्मक कारवाई करून तक्रारदारांना पोलिस संरक्षण दिल्याची माहिती त्यांनी खंडपीठास दिली.

कोणीही हस्तक्षेप करू नयेसदर प्रकल्प जनहिताचा असल्यामुळे त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये, असे खंडपीठाने बजावले. कोणी हस्तक्षेप केल्यास ‘एमजेपी’ने तक्रार द्यावी. त्यावर उच्च न्यायालयातर्फे नेमलेल्या समितीने कारवाई करावी, असे निर्देश दिले.

कामात अनेक त्रुटीया योजनेच्या कामातील अनेक त्रुटी निदर्शनास आणून देत मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी ‘जॅकवेल’च्या कामाबाबत तीव्र आक्षेप नोंदविला. कंत्राटदाराला अधिक मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश देण्याची विनंती केली. त्यावर अधिक मनुष्यबळ वाढवून पावसाळ्यापूर्वी ‘जॅकवेल’चे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन कंत्राटदाराने दिले. जलवाहिन्या अंथरण्यासाठी शहरभर रस्त्याच्या कडेला खड्डे खोदले आहेत. ते तसेच आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते भरले नाही तर नागरिकांना मोठा त्रास होईल. शासकीय नियमानुसार योजनेच्या कामाचे ‘त्रयस्थ’ पार्टीकडून परीक्षण करण्याचे आदेश देण्याची विनंती त्यांनी केली. या जनहित याचिकेवर ११ जूनला पुढील सुनावणी होणार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ