शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:38 IST

नशेखोराची टँकर चालकास मारहाण, महिलांवरही धावला

छत्रपती संभाजीनगर : जय भवानीनगर (गल्ली क्र. ११) येथे शुक्रवारी सायंकाळी एक गंभीर व धक्कादायक घटना घडली. महापालिकेच्या पाण्याच्या टँकरचे थोडेसे पाणी अंगावर उडाले, या क्षुल्लक कारणावरून एका नशेखोर तरुणाने टँकर चालकास बेदम मारहाण केली. यानंतर त्याने कोयता काढून परिसरात दहशत माजवली. 

घटनेदरम्यान टँकर चालक राजू काळेने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी अधिकच आक्रमक झाला. त्याने शिविगाळ करत चालकावर हल्ला चढवला. यावेळी काही महिला पुढे येत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत होत्या, पण या महिलांवरही आरोपीने धाव घेत धमकी दिली. त्याचा एक साथीदारही नागरिकांना धमकावत होता. महिलांनी वेळीच मागे हटल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, यामुळे टँकर चालकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर सकाळी काही नागरिकांनी जलकुंभावर जात पाणी पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली. आरोपिस ताब्यात घेतल्यानंतर टँकर पुरवठा सुरळीत करण्यात आला.

ठाकरेसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याचे धाडसकोयता हवेत फिरवत दहशत माजवणारा, महिलांवर धावून जाणाऱ्या तरुणाची माहिती ठाकरेसेनेच्या सुकन्या भोसले यांना मिळाली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यामध्येच त्यांना कोयता घेतलेला तरुण आढळला. त्यांनी लागलीच त्याला पकडून त्याच्या हातातून कोयता फेकून दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर