शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरला पुराच्या पाण्याचा वेढा

By admin | Updated: July 16, 2014 01:05 IST

दुपारपर्यंत पावसाचा जोर कमी

राजापूर : दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने राजापूर शहराला आज, मंगळवारी पुराच्या पाण्याने वेढा घातला. या पावसामुळे व्यापाऱ्यांना काल, सोमवारची रात्र जागून काढावी लागली. दुपारपर्यंत पावसाचा जोर कमी झाल्याने जवाहर चौकातील पाणी ओसरू लागले होते. तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून, कुठे नुकसान झाल्याची घटना घडलेली नाही. गुरुवारपासून पावसाने जोर धरला असून, सर्वत्र पावसाची दमदार हजेरी लागली आहे. त्यामुळे नद्या, नाले, ओढे, वहाळही पाण्याने भरून वाहत आहेत. दणक्यात पडणाऱ्या पावसाने काल रात्रीपासून आणखीच जोर धरला. त्यामुळे पुराच्या भीतीने शहरातील समस्त व्यापाऱ्यांसह नदीकाठच्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. अनेक व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला. आज सकाळपासून जवाहर चौकात पाणी वाढू लागले. त्यामुळे राजापूर एस. टी. आगाराकडून शहराकडे होणारी प्रवासी वाहतूक बंद होती. अन्य वाहतूक मात्र सुरू होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुराच्या पाण्याने जवाहर चौकाला वेढा दिला होता. पाणी पुढे सरकण्याच्या भीतीने उरल्यासुरल्या व्यापाऱ्यांनीही आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवात केली. सुदैवाने पावसाचा जोर थोडा कमी झाला आणि जवाहर चौकाभोवती आलेले पाणी हळूहळू कमी होऊ लागले होते. आज सकाळी पाण्यामुळे बंद केलेली राजापूर एस. टी. आगाराची सेवा दुपारनंतर जवाहर चौकापर्यंत पूर्ववत सुरू झाली होती. काल सकाळपासून आज सकाळपर्यंत राजापूर तालुक्यात ११९.८२ मिलिमीटर (सुमारे साडेचार इंच) पावसाची नोंद झाली. (प्रतिनिधी)