शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

बदनापूर तालुक्यात पाणीटंचाई

By admin | Updated: July 24, 2014 00:14 IST

दिलीप सारडा , बदनापूर पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुध्दा बदनापूर तालुक्यात पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

दिलीप सारडा , बदनापूरपावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुध्दा बदनापूर तालुक्यात पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यात यावर्षी अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस झाला. काही भागात अद्यापही पेरणी झालेली नाही. तालुक्यात काही भागात थोडासा पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस, तूर, बाजरी, सोयाबीन अशा खरीप पिकांची पेरणी केलेली आहे; परंतु पावसाने दडी मारल्यामुळे यातील काही पिके उगवल्यानंतर वाळत आहेत. काही पिके उगवली नसल्यामुळे या पिकांचे बियाणे खराब झाले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. काही शेतकऱ्यांनी खरीप पेरणीकरिता घरातील सोने-नाणे बँकांकडे गहाण ठेवून, काहींनी खाजगी सावकारांकडून कर्ज काढून तर काहींनी धान्य विक्रीतून खरीप हंगामासाठी बियाणे खतांची सोय केली. धरणीमातेची ओटी भरली. आता पाऊसच पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना काय करावे, हे कळेनासे झाले आहे.यापूर्वी रबी व उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांची गहू, ज्वारी, हरभरा ही पिके मोसंबी, आंबा या फळबागा पाऊस व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. यामुळे शेतकरी रबी व खरीप या दोन्ही हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी भरडला जात आहे. या भागातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शासन उदासीनया तालुक्यात जर कृत्रिम पाऊस पाडला असता तर शेतकऱ्यांची पेरणी होऊन खरीप पिकांना दिलासा मिळाला असता मात्र कृत्रिम पावसाकरिता शासनच उदासीन राहीले. तसेच या तालुक्यातील पर्जन्यमानाचा विचार करून लोकप्रतिनीधींनीही शासनाकडे कृत्रिम पावसाची मागणी लावून धरली नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई तालुक्यात पाऊस पडत नसल्यामुळे अर्धा पावसाळा झाला तरीही तालुक्यातील नदी, नाले कोरडेच आहेत. तसेच या तालुक्यात असलेले वाल्हा व राजेवाडी येथील साठवण तलाव व सोमठाणा येथील अप्पर दुधना धरण व अनेक कोल्हापुरी बंधारे अद्यापही कोरडेच आहेत. यामुुळे या तालुक्यातील पाणीपातळी वाढली नाही. अनेक गावांतील विहिरी व हातपंप कोरडे झाले आहेत. परिणामी, अनेक गावांत भर पावसाळ्यात ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.सध्या या तालुक्यातील नानेगाव, कुसळी,कडेगाव,राजेवाडी व अंतर्गत दोन वाडया, मांजगाव, वंजारवाडी व अंतर्गत तीन वाड्या, धोपटेश्वर, देवपिंपळगाव, ढोकसाळ या गावांना टँकरने पिण्याचा पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच तालुक्यातील खडकवाडी, परदेशवाडी, हालदोला, कुंभारी, बदनापूर, पाडळी, मात्रेवाडी,खामगाव, ढासला, पीरवाडी, मालेवाडी, अकोला, भिलपुरी, गोकुळवाडी तांडा आदी गावांना खाजगी विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केल्या जात आहे. तसेच या तालुक्यातील वाकुळणी,बाजार वाहेगाव, बदनापूर, दूधनवाडी, आसरखेडा, म्हसला-भातखेडा, तळणी-लोधेवाडी, चित्तोडा, आसोला, कंडारी बु,खामगाव, भाकरवाडी, वाघु्रळ, नांदखेडा, जवसगाव, सिरसगाव घाटी, पीरसावंगी, कंडारी खु, डोंगरगाव सा, सोमठाणा आदी गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे येथील पाणीपुरवठा विभागाने सुधारित प्रस्तावाकरिता शिफारस केली आहे.