शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

बिडकीन परिसरातील ‘पाणीबाणी’ दूर होणार; १८ कोटींच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 2:09 PM

डिएमआयसीमुळे बिडकीनचा झपाट्याने विकास होत असून सध्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाणी कमी पडू लागले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणअंतर्गत येथे राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणअंतर्गत येथे राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जवळपास १८ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात

- अनिल गव्हाणे

बिडकीन ( औरंगाबाद ) : डिएमआयसीमुळे बिडकीनचा झपाट्याने विकास होत असून सध्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाणी कमी पडू लागले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणअंतर्गत येथे राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जवळपास १८ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून प्राधिकरणकडून पाणी परिक्षणही करण्यात आले. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या मदतीने लवकरच बिडकीनला मुबलक पाणी मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत जायकवाडी परिसरात एक विहिर तसेच तेथून बिडकीनपर्यंत पाईपलाईन, दोन जलकुंभ, फिल्टर प्लॅन्ट व गावातील वितरण व्यवस्था (पाईपलाईन) अशी कामे करण्यात आली आहेत. सदरील कामाचे परिक्षण व पाणीतपासणी प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता भामरे, उपअभियंता चांदेकर, शाखा अभियंता सरोदे, शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज पेरे, या कामांचे ठेकेदार व्ही. आर. महाजन, डॉ. गणेश शिंदे, दिगंबर कोथिंबीरे, वामन साठे, अमोल कोथिंबीरे, कृष्णा काळे यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत केली. विहिरीतून बिडकीन फिल्टर प्लँटपर्यंत पाणी पोहचले असून लवकरच बिडकीनला मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. यासाठी बिडकीनचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व ग्रामविकास अधिकारी देवीदास ढेपले हे या कामावर लक्ष ठेऊन आहेत. लवकरच या योजनेचा लोकार्पण सोहळा थाटात होणार आहे.

लवकरच लोकार्पण होईल बिडकीन गावासाठी महत्त्वाचा असलेला पाणीप्रश्न महिनाभरात सुटणार असून जवळपास सर्व कामे झाली आहेत. किरकोळ कामे आटोपताच गावासाठी मुबलक व नियमित पाणीपुरवठा योजनेचे थाटात लोकार्पण करण्यात येईल. - सारिका मनोज पेरे, सरपंच

पाणीपुरवठा सुरु होणार जायकवाडी धरण ते गावातील फिल्टर प्लँटपर्यत पाणी आले असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांनीही पाहणी केली. लवकरच पाणीपुरवठाही सुरु होईल.- व्ही. आर. महाजन, ठेकेदार

महिनाभरात योजनेने उद्घाटनमहिनाभरात या योजनेने उद्घाटन होणार असून सुरुवातीचे ३ महिने ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या निगराणीखाली चालविली जाईल. त्यानंतर ग्रामपंचायतच्या ताब्यात ही योजना दिली जाईल.-देविदास ढेपले, ग्रामविकास अधिकारी

टॅग्स :water transportजलवाहतूकWaterपाणीAurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण