शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई निवारणासाठी पाणी साठवा अभियान

By admin | Updated: June 15, 2014 00:56 IST

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ पाणीटंचाईमुळे कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने अनोखी मोहीम सुरू केली

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळपाणीटंचाईमुळे कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने अनोखी मोहीम सुरू केली असून, पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने ‘पान साठवा-गाव वाचवा’ हे अभियान सुर करण्यात आले आहे़ या अभियानात सहभागी होऊन उत्कृष्ट पाणी साठवण करून जमिनीत मुरविणाऱ्या ग्रामपंचायतीस रोख पुरस्काराबरोबरच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाई कृती आराखड्याच्या माध्यमातून अनेक हंगामी योजना राबविण्यात येतात़ अधिग्रहण करून लोकांची सोय केली जाते़ यासाठी लाखो रूपयांचा खर्चही होतो़ म्हणून शासनाने आता पावसाळा सुरु होण्यापूर्वी अनोखी स्पर्धात्मक मोहीम सुरु केली आहे़ यासाठी ‘पाणी साठवा-गाव वाचवा’ हे अभियान सुरू करून पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला जावा यासाठी मे महिन्याच्या अखेरीस शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे़ पाणीपुरवठ्यासाठी योजनांचा समावेश यात राहणार आहे़ सदरील अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी सन २०१४-१५ या वर्षात जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, यासाठी सुचित केले आहे़ त्यामुळे शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन अभंगे यांनी शुक्रवारी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचांची बैठक घेऊन योजनेत सहभागी होण्यासाठी माहिती दिली आहे़ यावेळी विस्तार अधिकारी बालाजी पोतदार उपस्थित होते़पाच महिन्याचा कालावधी़़़या अभियानाचा कालावधी १५ आॅक्टोबरपर्यंत म्हणजे पाच महिने राहणार असून, या पाच महिन्याच्या कालावधीत जेवढा पाऊस होणार आहे़ त्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे़ यात पाणी पुरवठ्याच्या सर्व योजनांचा समावेश राहणार आहे़४सदरील अभियान लोकसहभाग, वित्त आयोग विविध योजनांच्या निधींचा सहभाग याच्या माध्यमातून राबविले जाणार असल्याने तालुक्यातील सर्वच म्हणजे ४३ ग्रामपंचायती सक्रिय सहभागी होणार असल्याचे विस्तार अधिकारी पोतदार यांनी सांगितले़