शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; दरमहा कोट्यवधी रुपयांची उलाढाल, असा होतो पाण्याचा काळाबाजार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 20:16 IST

वर्षभरात मनपाच्या तिजोरीतून किमान ६ कोटी रुपये टँकरच्या पाण्यावर पैसे खर्च केले जातात.

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या पाण्यावर अक्षरश: दरोडा टाकण्यात येत आहे. महापालिकेने नियुक्त केलेला कंत्राटदार, पाण्याच्या टाक्यांवर नियुक्त केलेले कर्मचारी आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारा चालक यांच्या संगनमताने पाण्याचा काळाबाजार कशा पद्धतीने चालतो, याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

शहरात सध्या सर्वत्र पाण्यासाठी प्रचंड ओरड होत आहे. नागरिकांच्या हक्काचे टँकरचालक नेत आहेत. पडेगाव, मिटमिटा, चिकलठाणा, बीड बायपास येथील हॉटेल व्यावसायिकांना पाणी विकण्यात येत आहे. कोटला कॉलनी पाण्याच्या टाकीवरून तब्बल १२ हजार लीटरचे टँकर पहाटे ४ वाजेपासून भरून विकण्यात येतात, अशीही धक्कादायक माहिती आहे.

टाकीवरील कर्मचारी मालामालमहापालिकेने ८० पेक्षा अधिक टँकर नेमले आहेत. कोटला कॉलनी, एन-५, एन-७, नक्षत्रवाडी येथून टँकर भरले जातात. एक टँकर किमान ७ फेऱ्या करतो. जास्तीतजास्त ९ फेऱ्याही होतात. काळ्याबाजारात टँकर नेण्यासाठी टाकीवरील कर्मचारी एका फेरीचे १०० रु. घेतो. दिवसभरात किमान १०० फेऱ्यांचे १० हजार रु. तो खिशात घालतो. महिना ३ लाख रुपयांची कमाई एक कर्मचारी करतो, हे विशेष.

कंत्राटदाराचे बिल दरमहा ५० लाखमहापालिका कंत्राटदाराला किलोमीटरनुसार पैसे देते. ८० टँकरचे बिल दरमहा किमान ५० ते ५५ लाख रु. होते. वर्षभरात मनपाच्या तिजोरीतून किमान ६ कोटी रुपये टँकरच्या पाण्यावर पैसे खर्च केले जातात. एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करून काहीच उपयोग नाही, हे विशेष.

टँकरचालकांची वेगळी कमाईटँकरचालक ज्या वसाहतींमध्ये पाणीपुरवठा करतात तेथे ५० रुपये ड्रमप्रमाणे पाणी राजरोसपणे विकतात. त्याचप्रमाणे अनेक नागरिक मनपात येऊन पैसे भरू शकत नाहीत. एका ग्रुपचे १८ ते २० हजार रुपये टँकरचालक मनपात भरतो, म्हणून स्वत:कडेच ठेवून घेतात. चोरून आणलेले पाणी नंतर त्यांना देत असतात.

‘लोकमत’चा दणकामनपाने नियुक्त केलेले टँकरमाफिया पाण्याचा कशा पद्धतीने काळाबाजार करीत आहेत, यासंदर्भात ‘लोकमत’ने रविवारपासून वृत्तमालिका सुरू केली. याची दखल घेत मनपा प्रशासनाने प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे यांची उचलबांगडी केली. पाणीपुरवठ्यात अनेक वर्षे काम केलेले निवृत्त कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे कंत्राटी पद्धतीवर मनपात आहेत. त्यांच्याकडे पूर्ण अधिकारासह पाणीपुरवठा विभाग सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी