शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जायकवाडीत ६ टक्के पाणी वाढले; पण धरण मृतसाठ्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:59 IST

नाशिक जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग वाढविला

ठळक मुद्दे४० हजार क्युसेकपेक्षा जास्त आवक अपेक्षितनाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील धरणातून विसर्ग

पैठण (औरंगाबाद ) : गेल्या तीन दिवसांत धरणाच्या जलसाठ्यात ६ टक्के वाढ झाली असून, धरणाचा जलसाठा मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आता फक्त ३.५ टीएमसी पाण्याची गरज आहे. गेल्या २४ तासांत धरणात १.८१ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील धरणातून सोमवारपासून वाढविण्यात आलेला विसर्ग आजही  कायम आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत असल्याने मंगळवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात येणारी आवक वाढत  आहे. सायंकाळी ४ वाजता धरणात २९१६९ क्युसेक क्षमतेने पाणी दाखल होत होते. मध्यरात्रीनंतर आवक ४०,००० क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्याला काल पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नाशिकातील धरण समूहातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज दारणा धरणातून ९२५४ क्युसेक, गंगापूर धरणातून ८८३३ क्युसेक, कडवा धरणातून ७७६ क्युसेक, पालखेड धरणातून २८१० क्युसेक असा विसर्ग सुरू होता.

नांदूर-मधमेश्वर वेअरमधून सोमवारपासून गोदावरी पात्रात सुरू असलेला विसर्ग आजही ५०,०६५ क्युसेकने सुरू होता. गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीला दोन दिवसांपासून पूर आलेला आहे. जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या वैजापूर तालुक्यातील नागमठाण बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात मंगळवारी सायंकाळी ४०,००० क्युसेक विसर्ग होत होता. हे पाणी मंगळवारी रात्री आठनंतर जायकवाडी धरणात दाखल होईल, असे जायकवाडीचे धरण अभियंता संदीप राठोड यांनी सांगितले. जायकवाडी धरणात २९१६९ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. सायंकाळी धरणाची पाणीपातळी १४९२.११ फूट अशी झाली होती. धरणात एकूण जलसाठा ६६७.३९४ दलघमी एवढा झाला आहे. धरण मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी १००.७१२ दलघमी ( ३.५ टीएमसी) पाण्याची गरज आहे. धरणाचा जलसाठा-४.६३ टक्के झाला आहे.

तहानलेल्या मराठवाड्यासाठी गोदामायने घेतली धाव )

४० हजार क्युसेकपेक्षा जास्त आवक अपेक्षित गेल्या दोन दिवसांपासून नांदूर-मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात ५० हजार क्युसेकपेक्षा जास्त क्षमतेने विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणाच्या वर नागमठाण येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरी मंगळवारी सायंकाळी ४० हजार क्युसेक क्षमतेने वाहती होती. गोदावरीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ नोंदविली जात असल्याने मंगळवारी रात्री ८ वाजेनंतर धरणातील आवक ४० हजार क्युसेकपेक्षा जास्त होईल, अशी माहिती जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.

 

 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीNashikनाशिकRainपाऊसgodavariगोदावरीgangapur damगंगापूर धरण