शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीत जॅकवेलनंतर ३७०० HP पंपाची चाचणी यशस्वी, जलवाहिनीत ४ किमीपर्यंत आले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:55 IST

३८ किमी आहे २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी; स्वच्छतेसाठी लागणार किमान ८ ते १० दिवस

 

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणी पुरवठा योजनेचा आणखी एक मोठा टप्पा सोमवारी पार पडला. जायकवाडी धरणात उभारलेल्या जॅकवेलवरील ३७०० अश्वशक्तीचे पंप सुरू करून २५०० मिमी व्यासाच्या महाकाय जलवाहिनीत रात्री ८ वाजता पाणी घेण्यात आले. ४ किमी अंतरापर्यंत हे पाणी घेऊन जलवाहिनी धुवून स्वच्छ करण्यात आली. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत ही चाचणी यशस्वी पार पडली.

२७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील महत्त्वाचे विविध टप्पे हळूहळू पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करत येत आहेत. योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून शहरात २०० एमएलडी वाढीव पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी जायकवाडी धरणातील पाणी सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये घेण्यात आले. जॅकवेलमध्ये तीन दिवस पाणी ठेवण्यात आले. जॅकवेलला कुठेही मोठे लिकेज नसल्याचे निदर्शनास आले. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच जॅकवेलवर पंपिंगची टेस्टिंग घेण्याची कवायत सुरू झाली. महावीर हायड्रो, फ्लूट इलेक्ट्रोमेट आणि जीव्हीपीआर यांनी मिळून टेस्टिंगची प्रक्रिया पूर्ण केली. सायंकाळी ५ वाजता टेस्टिंगला सुरुवात करण्यात येणार होती. छोट्या-मोठ्या तांत्रिक अडचणींमुळे चाचणीला विलंब झाला. रात्री ८ वाजता आयुक्त जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत पंप सुरू करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह जीव्हीपीआर कंपनीचे महाव्यवस्थापक महेंद्र गोगुलोथु आदी उपस्थित होते.चाचणी यशस्वी झाली

आयुक्त जी. श्रीकांत आणि मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ३७०० अश्वशक्तीच्या पंपाची चाचणी रात्री यशस्वी झाली. तब्बल १ तास पंप सुरू होता. रात्री ९:०० वाजता पंप बंद करण्यात आला. २५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीत पाणी घेण्यात आले. १ किमी अंतरावर स्मशानभूमीजवळ एक स्कोअर व्हॉल्व्ह आहे, त्यातून पाणी बाहेर काढण्यात येत होते. चाचणीची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

४ किमीपर्यंत आले पाणीजायकवाडी धरणापासून नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनीची लांबी ३८ किमी आहे. प्रत्येक ४ ते ५ किमी अंतरावर पाणी सोडण्यासाठी स्कोअर व्हॉल्व्ह सोडला आहे. त्यातून अशुद्ध पाणी बाहेर सोडण्यात येईल. जलवाहिनी स्वच्छ करण्याची ही प्रक्रिया किमान ८ ते १० दिवस चालणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jaikwadi: 3700 HP Pump Test Successful, Water Reaches 4 km

Web Summary : Jaikwadi's new water project achieved a milestone. A 3700 HP pump test succeeded, sending water 4 km through the pipeline. Cleaning continues.
टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीMunicipal Corporationनगर पालिका