शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण संरक्षक भिंतीमुळे विद्यापीठाच्या ग्रंथालयात शिरले पाणी; प्रशासनाची दिवसभर स्वच्छता मोहीम

By राम शिनगारे | Updated: September 27, 2024 15:58 IST

विद्यार्थ्यांसह ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मौल्यवान ग्रंथसंपदा वाचली.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील ऐतिहासिक ग्रंथालयामध्ये बुधवारी मुसळधार पावसामुळे पाणी शिरले. विद्यार्थ्यांसह ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मौल्यवान ग्रंथसंपदा वाचली. ग्रंथालयाच्या तळघराच्या बाजूने असलेली संरक्षक भिंती पूर्णपणे जीर्ण झाली आहे. त्यामधून बाहेरील पाणी तळघरात आले. या तळघराजवळील ड्रेनेजमध्ये ते पाणी गेले नाही, त्यामुळे ग्रंथालयात पाणी शिरल्याचे गुरुवारी समोर आले.

ग्रंथालयाच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करून पाणी बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून तुंबलेले ड्रेनेज साफ केले. कर्मचारी रात्रभर पावसावर आणि पाण्यावर लक्ष ठेवून होते, अशी माहिती ग्रंथालयाच्या संचालक डॉ. वैशाली खापर्डे यांनी सांगितले. तळघराच्या बुकशेल्फच्या दोन कप्प्यातील ग्रंथ उचलण्यात आल्यामुळे एकही ग्रंथ भिजला नाही. तळघराच्या बाजूने इमारतीचे पाणी जाण्यासाठी एक ड्रेनेज बनविण्यात आलेले आहे. या ड्रेनेजच्या बाजूलाच संरक्षक भिंत बांधलेली आहे. या संरक्षक भिंतीच्या वरील बाजूने पाणी साचून ते भिंतीमधून तळघराच्या ड्रेनेजच्या नालीमध्ये उतरले. हे पाणी अधिकचे असल्यामुळे दरवाजासह इतर मार्गाने पाणी तळघरात पोहोचल्याचेही डॉ. खापर्डे यांनी सांगितले. जेव्हा तुंबलेले ड्रेनेज मोकळे केले तेव्हा पाणी सुरळीतपणे गेले. त्याचवेळी अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी तळघरातील पाणी काही वेळातच बाहेर फेकले. त्यानंतर गुरुवारी दिवसभर तळघराची स्वच्छता करण्यात येत होती. ड्रेनेजच्या पाण्यामुळे तळघरातून दुर्गंधी येत होती. ती स्वच्छ करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्याचवेळी संरक्षक भिंतीच्या बाजूला आलेले गवत, घाणही साफ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मालमत्ता विभागाकडे पत्रव्यवहारविद्यापीठातील मालमत्तेची देखभाल करणाऱ्या मालमत्ता विभागाकडे संरक्षक भिंतीच्या परिसरासह ड्रेनेज स्वच्छ करण्यासाठी ग्रंथालयातर्फे पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, नेहमीप्रमाणेच त्याकडे मालमत्ता विभागाने दुर्लक्ष केल्याचेही समोर आले आहे. ग्रंथालयात पाणी शिरल्यामुळे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगिता होके पाटील, अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे, डॉ. उमाकांत राठोड, प्रा. हरिदास (बंडू) सोमवंशी, प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांनी प्रशासनासोबत याविषयी संवाद साधला. तसेच ग्रंथालयाला भेट दिल्याचे दिसून आले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षणRainपाऊस