जल संवर्धनाचा लातूर पॅर्टन व्हावा
By Admin | Updated: March 18, 2015 00:19 IST2015-03-18T00:10:33+5:302015-03-18T00:19:32+5:30
लातूर : लातूर जिल्हा परिषदेने आपल्या कार्याच्या जोरावर यशवंत पंचायत राज अभियानात प्रथम क्रमांक मिळवून देशपातळीवरही नावलौकिक मिळवला आहे़

जल संवर्धनाचा लातूर पॅर्टन व्हावा
लातूर : लातूर जिल्हा परिषदेने आपल्या कार्याच्या जोरावर यशवंत पंचायत राज अभियानात प्रथम क्रमांक मिळवून देशपातळीवरही नावलौकिक मिळवला आहे़ असाच ‘लातूर पॅटर्न’ जल संवर्धनाचा निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी मंगळवारी येथे केले़
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व स्वच्छता जनजागृती सप्ताह निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजनाअंतर्गत ‘जल है तो कल है’ ही विशेष कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती़ यावेळी जि़प़ अध्यक्षा प्रतिभाताई पाटील मार्गदर्शन करीत होत्या़ यावेळी मंचावर समाजकल्याण सभापती वेणूताई गायकवाड, बांधकाम सभापती सपना घुगे पाटील, जि़प सदस्य राजेसाहेब सवाई , मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, प्रायमो पुणेचे सचिन हतागळे, विभागीय समन्वयक अरूण रसाळ, पाणी व सच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शाम पटवारी यांची उपस्थिती होती़ प्रतिभा पाटील म्हणाल्या, जिल्ह्यात सर्वत्रच पाणीटंचाई जाणवत आहे़ या पाणीटंचाईला आपण सर्वजण जबाबदार आहेत़ जमिनीतून पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे़ त्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत घट होत आहे़ पडलेला पाऊस, सांडलेले पाणी, नदी-नाल्याच्या माध्यमातून वाहून जात आहे़ ते जमिनीत मुरले जात नाही़ त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच जलसंवर्धनाचे महत्व ओळखून सर्व नागरिकांनी जलसंवर्धनात लातूर पॅटर्न निर्माण करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
भविष्यात पाण्यासाठी युध्द होतील, असे एका विचारवंताने भविष्यवाणी केली होती़ ही भविष्यवाणी खरी ठरेल की काय, असे वाटत आहे़ देशात व राज्यात पाणीटंचाईच्या झळा नागरीक सोसताना दिसून येत आहेत़ या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी, सर्वांनी पडलेल्या पावसाचे पाणी व वापर करून टाकलेले पाणी तसेच वाहून जाणारे पाणी हे जमिनीत जिरवले पाहिजे़