इंदेवाडीजवळील जलकुंभ असुरक्षित
By Admin | Updated: May 15, 2015 00:48 IST2015-05-15T00:37:59+5:302015-05-15T00:48:11+5:30
जालना : शहरातील इंदेवाडी गावाजवळ असलेला नगरपालिकेचा जलकुंभ असुरक्षित आहे. कारण या जलकुंभाला करण्यात आलेले तारेचे कुंपन उखडून गेले आहे.

इंदेवाडीजवळील जलकुंभ असुरक्षित
जालना : शहरातील इंदेवाडी गावाजवळ असलेला नगरपालिकेचा जलकुंभ असुरक्षित आहे. कारण या जलकुंभाला करण्यात आलेले तारेचे कुंपन उखडून गेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जलकुंभाची आतील बाजूने सफाईच झाली नसल्याचा प्रकारही समोर आला आहे.
१९८९ मध्ये २२.५० लाख क्षमतेचा हा जलकुंभ तयार करण्यात आला. त्यावेळी जलकुंभामध्ये उतरण्यासाठी लोखंडी पायऱ्या होत्या. परंतु कालांतराने मागील काही वर्षांपासून या पायऱ्याच गायब झालेल्या आहेत. एवढेच नव्हे, तर जलकुंभावर जाण्यासाठीच्या सिमेंटच्या पायऱ्या देखील जीर्ण झाल्याने त्यावर कोणी जात नाही. परिणामी जलकुंभाची आतील बाजूने सफाईच झालेली नाही. अशा परिस्थितीत अंबड मार्गे शुद्धीकरण करून येणारे पाणी या जलकुंभात साठविले जाते.
या जलकुंभाच्या आवाराभोवती तारेचे कुंपन करून आतील बाजूने वॉचमनच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु तारेचे कुंपन उखडून गेल्याने तेथे रात्रीच्या सुमारास तळीरामही येऊन बसत असल्याचे प्रकार होत असल्याचे सांगण्यात आले. (समाप्त)