शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

गेवराई तालुक्यातील ओसाड जमीन बनली सुपीक

By admin | Updated: May 26, 2014 00:23 IST

दिनेश गुळवे , बीड गेवराई तालुक्यातील तलवडा परिसरातील बहुतांश जमीन माळरानाची व ओसाड. यामुळे शेतकर्‍यांना कष्ट करूनही उत्पन्न निघत नसे.

 दिनेश गुळवे , बीड गेवराई तालुक्यातील तलवडा परिसरातील बहुतांश जमीन माळरानाची व ओसाड. यामुळे शेतकर्‍यांना कष्ट करूनही उत्पन्न निघत नसे. आता मात्र शेतकरी या माळरानाच्या जमिनीत गाळ टाकून माळरान फुलवित आहेत. यावर्षी तब्बल तीन हजार एकरवर शेतकर्‍यांनी तलवाडा तलावातील गाळ टाकला आहे. यामुळे ओसाड जमीन सुपीक झाली आहे. गतवर्षी बीड जिल्ह्यात मोठा दुष्काळ पडला होता. या आपत्तीकडे प्रशासनासह शेतकर्‍यांनी संधी म्हणून पाहिले. जिल्ह्यातील अनेक तलाव तीस ते चाळीस वर्षापासून गाळाने खचाखच भरले होते. यामुळे तलावाचे क्षेत्र मोठे असले तरी सिंचन होत नव्हते तसेच या गाळामुळे तयार झालेल्या जमिनीवर अनेकांनी शेती कसण्यास सुुरुवात केली होती. गेल्यावर्षी दुष्काळात सर्वच तलाव कोरडेठाक पडले होते. यावेळी प्रशासनाने लोकसहभागातून तब्बल ११७ प्रकल्पातील १ कोटी ब्रास गाळ काढला. या गाळामुळे अनेकांची माळरानाची जमीन सुपीक झाली. गेल्यावर्षी तलवाडा येथे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या उपस्थितीत गाळ काढण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शेतकर्‍यांना हा गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. यानंतर अनेक शेतकर्‍यांनी आपल्या शेतात गाळ टाकला. परिणामी तलवाडा तलावात पाणीसाठा तर मोठ्या प्रमाणावर झालाच शिवाय शेतकर्‍यांच्या उत्पादनातही वाढ झाली. यावर्षीही तलवाडा तलावातून गाळ काढण्यास प्रशासन प्रोत्साहन देत आहे. यामुळे शेतकरी स्वखर्चातून आपल्या जमिनीत गाळ टाकत आहेत. या कामाची रविवारी अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी अनेक शेतकर्‍यांशी संवादही साधला. यावर्षी तब्बल तीन हजार एकरवर शेतकर्‍यांनी गाळ टाकला असल्याचे त्यांनी सांगितले. या तलावातील गाळ काढण्यास काही अडचणी येत आहेत का? कोणी मनाई करीत आहे का? याची विचारणाही यावेळी त्यांनी शेतकर्‍यांकडे केली. तसेच प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकरी कशा पद्धतीने गाळ टाकत आहेत, याची पाहणीही केली. बारवाला मुबलक पाणी तलवाडा येथील बारव उन्हाळा लागताच कोरडाठाक पडत होता. गेल्यावषी तलवाडा तलावातील गाळ काढल्याने येथे मोठ्या प्रमाणात सिंचन झाले. परिणामी परिसरातील बारव, विहिरी, कूपनलिका यांचीही पाणीपातळी वाढली. आता कडक उन्हाळा असला तरी येथील तलावाला मुबलक पाणी आहे. यावर्षी गावात पाणीटॅँकरचीही गरज भासली नसल्याचे अंकुश थोरात, योगेश नरसाळे यांनी सांगितले. गाळाने जमीन सुपीक करावी शेतामध्ये तलावातील गाळ टाकल्यास माळरान, मुरमाड असलेल्या जमिनीचा पोत सुधारतो. तलवातील गाळ काढल्यामुळे तलावामध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचते शिवाय पाण्याचा निचराही मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे परिसरातील पाणीप्रश्नही मिटतो. गाळ टाकलेली जमीन चिबडत नाही तसेच येथे तन, गवतही कमी प्रमाणात उगते. गाळामुळे जमिनीची उत्पादकताही वाढते. यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्याप्रमाणावर तलावातील गाळ जमिनीत टाकावा, असे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले. उत्पादनात झाली वाढ तलवाडा परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी गेल्यावर्षी शेतात गाळ टाकला होता. यानंतर अनेकांनी फळबाग केल्या तर काहींनी कपाशीचे पीक घेतले. ज्या मुरमाड जमिनीत एकरी पाच क्विंटलही कापूस होत नव्हता, तेथे गाळ टाकल्यानंतर वीस क्विंटल कापूस निघाल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते शाम कुंड यांनी सांगितले.