शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी सांप्रदाय आधुनिकतेशी नाळ जोडण्यात कमी पडला : नामदेवशास्त्री

By admin | Updated: April 9, 2015 00:15 IST

प्रताप नलावडे , बीड बदलत्या काळानुसार वारकरी सांप्रदाय बदलला नाही. आधुनिकतेशी नाळ जोडण्यात कमी पडल्यामुळे नव्या पिढीला घडविताना त्यांच्यावर संस्कार करण्यात

प्रताप नलावडे , बीडबदलत्या काळानुसार वारकरी सांप्रदाय बदलला नाही. आधुनिकतेशी नाळ जोडण्यात कमी पडल्यामुळे नव्या पिढीला घडविताना त्यांच्यावर संस्कार करण्यात हा सांप्रदाय कमी पडला असे सांगतानाच भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी ज्या कीर्तनकारांनी स्वत:ला आधुनिकतेसोबत जोडले, ते संस्कार देण्याचे काम तळमळीने करत असल्याचे आवर्जून सांगितले. नारळी सप्ताहाच्या निमित्ताने ते लोकमतशी बोलत होते.समाजात काही अमुलाग्र बदल करायचे असतील तर त्यासाठी वारकरी सांप्रदायाचे माध्यम खूप प्रभावी असल्याचे सांगत नामदेव महाराज म्हणाले, संसार हा सुखाचा होत नाही, असे अगदी स्पष्टपणे सांगणारा हा सांप्रदाय आहे. आमच्याकडे येणारा प्रत्येकजण हा निरपेक्ष भावनेने येत असतो. त्याला काही अपेक्षा नसते. आजच्या कीर्तनकारात काहीजणांनी आधुनिकतेचा स्वीकार केला आहे, परंतु जे जुने कीर्तनकार आहेत, ते हा बदल स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे तरूण पिढीशी त्यांचा संवाद प्रभावी होताना दिसत नाही. कीर्तन हे समाजप्रबोधनाचे खूप प्रभावी माध्यम आहे. आज तंत्रज्ञानात कितीही बदल झाला असला तरी त्याचा कीर्तनावर परिणाम झालेला नाही. म्हणूनच हिंगणी सारख्या छोट्याशा गावात जेव्हा नारळी सप्ताहाचे आयोजन होते, तेव्हा लाखाच्या घरात लोक आजही कीर्तनासाठी आवर्जून येतात.संत भगवान बाबांनी सुरू केलेली ही नारळी सप्ताहाची परंपरा विशद करताना नामदेव महाराज म्हणाले, ८२ वर्षापूर्वी सप्ताहाची कल्पना बाबांनीच प्रत्यक्षात उतरविली. या सप्ताहाला राज्यभरातून भाविक येतात. एका छोट्याशा गावात संपूर्ण राज्याचे प्रतिबिंब उमटताना पाहिले की या सप्ताहाची उंची आपल्या लक्षात येते. समाजप्रबोधनासाठी सुरू केलेली ही सप्ताहाची परंपरा आजही तशीच सुरू आहे. केवळ कीर्तन आणि भजन इतकेच या सप्ताहाचे स्वरूप नाही तर समाजिक बांधिलकीही जपली जाते. सामाजिक ऐक्याचा काला !हिंगणी खुर्द या गावात गुरूवारी सप्ताहाची समाप्ती होत आहे. यावेळी होणारा काला हा खऱ्या अर्थाने सामाजिक ऐक्याचा काला म्हणावा लागेल. लोक सप्ताहाची सुरूवात झाल्यापासून जमेल तशी मदत करत आहेत. आजुबाजुच्या गावातून टेंम्पो भरून भाकरी येतात. या सप्ताहात कोणता धर्म नाही आणि कोणती जात नाही. भेदाभेदच्या पलिकडचे हे सगळे आहे. भगवान गडावर आजवर काहीजणांनी जाणीवर्पूक जातीयतेचे आरोप केले. परंतु भगवान गडाने कधी जात पात पाहिली नाही. समाजासाठी निरंतर काम करत राहणे इतकेच काय ते आम्हाला माहिती आहे, असेही डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले. भगवान गडावर आजही १०० विद्यार्थी प्राचीन अध्यात्माचे शिक्षण घेत असून याचवेळी ते प्रचलित महाविद्यालयीन शिक्षणही घेत असल्याचे ते आवर्जून म्हणाले.भगवानगडापेक्षा कोणीही मोठा नाहीभगवानगडावर सर्वसामान्य भाविकांपासून ते राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी हजेरी लावत असतात. मात्र, ते सर्वजण भक्त म्हणून येतात. भगवानगडापेक्षा कोणीही मोठा नाही, असे सांगून नामदेवशास्त्री म्हणाले, आईला सर्व लेकरं समान असतात. गड कोणा एकाचा नाही तर सर्वसामान्य भाविकांचा आहे.