सरकारी ‘स्टाफ नर्स’ व्हायचे, नियुक्तिपत्राचा रेट २० लाख! अपात्र उमेदवाराच्या पत्राने बसला धक्का

By संतोष हिरेमठ | Updated: June 2, 2025 12:13 IST2025-06-02T12:13:26+5:302025-06-02T12:13:49+5:30

राज्यात २०१८ पासून हा गैरप्रकार सुरू असल्याचे समजते

Wanted to become a government 'staff nurse', appointment letter rate 20 lakhs! Shocked by letter from ineligible candidate | सरकारी ‘स्टाफ नर्स’ व्हायचे, नियुक्तिपत्राचा रेट २० लाख! अपात्र उमेदवाराच्या पत्राने बसला धक्का

सरकारी ‘स्टाफ नर्स’ व्हायचे, नियुक्तिपत्राचा रेट २० लाख! अपात्र उमेदवाराच्या पत्राने बसला धक्का

संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: ‘२० लाख रुपये मोजा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून नियुक्ती मिळवा’, असा धंदा काहींनी सुरू केला आहे. राज्यात २०१८ पासून हा गैरप्रकार सुरू असल्याचे समजते. छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात अपात्र उमेदवार वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाचे नियुक्तीपत्र घेऊन आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या अधिनस्थ संस्थांमधील अधिपरिचारिका (गट-क) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी २०२३ मध्ये परीक्षा घेण्यात आली. २०२४ मध्ये गुणवत्ताधारक आणि पात्रताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. २५ मार्च २०२५ रोजीचे नियुक्तिपत्र घेऊन एक उमेदवार रुजू होण्यासाठी २७ मे रोजी दाखल झाला; परंतु इतक्या उशिराने नियुक्ती आल्याने कर्मचाऱ्याला शंका आली. पात्रताधारक यादीत नावच नसल्याने हा उमेदवार अपात्र असल्याचे लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्याने चौकशी सुरू करताच उमेदवाराने काढता पाय घेतला.

असा काही प्रकार झालेला असेल, तर छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता गुन्हा दाखल करतील. पूर्वीची भरतीप्रक्रिया संपलेली आहे. आता नवीन भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
-राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि आयुष

Web Title: Wanted to become a government 'staff nurse', appointment letter rate 20 lakhs! Shocked by letter from ineligible candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.