शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

हुडहुडीतही पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: December 25, 2014 00:48 IST

औरंगाबाद : शहरातील सर्वच भागांमध्ये आज नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी पाण्यासाठी या वॉर्डातून त्या वॉर्डात धावपळ केली.

औरंगाबाद : शहरातील सर्वच भागांमध्ये आज नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी पाण्यासाठी या वॉर्डातून त्या वॉर्डात धावपळ केली. २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण असून, तो सण आता पाण्याविना साजरा करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सोमवारी रात्री फारोळा येथील डिलिव्हरी लाईनला भगदाड पडल्यामुळे दोन दिवसांपासून सिडको-हडकोसह सर्व शहरात पाण्याची बोंब झाली आहे. शुक्रवारी व शनिवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा झाला होता, त्यांना बुधवारीही पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे तब्बल पाच दिवस निर्जळीला सामोरे जावे लागल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. महागड्या टँकर्सचे पाणी त्यांना विकत घ्यावे लागले. सिडको-हडकोमध्ये पाण्याचे वेळापत्रक कोलमडले. पाच दिवसांपासून २२ वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा झालेला नाही. बुधवारीही त्या वॉर्डांपैकी बहुतांश ठिकाणी निर्जळी होती. नागरिकांना ३०० रुपयांप्रमाणे टँकर विकत घ्यावे लागले. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने टँकरने पाणीपुरवठा करण्यास उशीर केल्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. टँकरचे भाव चढले...साधारणत: २५० रुपयांना २ हजार लिटर टँकरचा दर आहे. ते टँकर दोन दिवसांपासून ३०० रुपयांपेक्षा जास्त भावाने विक्री होत आहे. सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने टँकर न पाठविल्याने सिडको-हडकोमध्ये खाजगी टँकरचे पाणी नागरिकांना विकत घ्यावे लागले.गारखेडा, उल्कानगरी, ज्योतीनगर, रेल्वेस्टेशन, सिल्कमिल कॉलनी, ज्युबिली पार्क परिसरात खाजगी टँकरने पाणीपुरवठा झाला. सिडको-हडकोतील चाकरमान्यांचे हाल झाले. काही कर्मचाऱ्यांनी अर्ध्यावर सुटी टाकून पाणी भरण्यासाठी घर गाठले होते. मात्र पाणीपुरवठाच झाला नाही. दरम्यान, कंपनीने असा दावा केला आहे की, शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. महापौरांच्या वॉर्डासह अनेक भागांत ठणठणाटविद्यानगर या महापौर कला ओझा यांच्या वॉर्डातदेखील आज पाणीपुरवठा झाला नाही. उस्मानपुरा, पीरबाजार, ज्योतीनगर, दशमेशनगरमध्ये आज पाणी आले नाही. पुंडलिकनगर जलकुंभावर नागरिकांनी पाण्यासाठी सकाळी गर्दी केली होती.सकाळी ११.३० वा. त्या भागाला पाणीपुरवठा झाला. दुपारी नगरसेविका ऊर्मिला चित्ते, नितीन चित्ते व नागरिकांनी एन-७ जलकुंभावरील कर्मचाऱ्यांशी संपर्क केला. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. कुणीही प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी एन-५ जलकुंभाकडे धाव घेऊन पवननगर, हडकोमध्ये पाणीपुरवठा केव्हा होणार याची विचारणा केली. ५ मिनिटांत फोन करून सांगतो, असे उत्तर देऊन संबंधिताने फोन बंद केला. त्यामुळे चित्ते संतापले. मनपाच्या अधिकाऱ्यांनीदेखील हात वर केल्यामुळे पाणीपुरवठा केव्हा होणार हे कुणीही न सांगितल्याने चित्ते दाम्पत्य घरी परतले.शांतीपुरा येथील नागरिकांनी ज्युबिली पार्क जलकुं भावर आंदोलन केले. पाणीपुरवठा करावा, अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर सिल्कमिल कॉलनीतीन नागरिकांनी परिसरात आधी पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी आंदोलन केले. पडेगाव, मिटमिटा विकास कृती समितीचे लतीफ पटेल यांनी कोटला कॉलनी जलकुंभावरील धोंडिराम बनकर हा कर्मचारी टँकरसाठी पैसे घेऊन पाणीपुरवठा करीत नसल्याचा आरोप केला.