शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

जागविल्या १९७१ युद्धाच्या आठवणी

By admin | Updated: December 17, 2014 00:00 IST

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील कारगिल स्मृतिवन येथील प्रांगणात १६ डिसेंबर या विजयी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या अनेक आठवणी जागवण्यात आल्या.

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील कारगिल स्मृतिवन येथील प्रांगणात १६ डिसेंबर या विजयी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या अनेक आठवणी जागवण्यात आल्या. १३ शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना या निमित्ताने शहिदांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देण्यात आली. या पिढीने एनसीसी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये आपले करिअर घडवून राष्ट्रसेवा करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मानव विकास मिशनचे कार्याध्यक्ष भास्कर मुंडे, ज्ये. स्वा. सैनिक पन्नालाल गंगवाल, ब्रिगेडियर एस.यू.दशरथ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहिदांना अभिवादन व माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला. सकाळी ७.३० ते ९.३० वाजेदरम्यान माजी सैनिक कल्याण कार्यालय, कारगिल स्मृतिवन समिती, समाजभूषण रुंजाजी भारसाखळे कॉलेज, द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटस् आॅफ इंडिया व नगरसेवक पंकज भारसाखळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मे. डॉ. कडेठाणकर, कॅ . सुरेंद्र सुर्वे, ग्रुप कॅ.नाईक, कर्नल रमेश वाघमारे, नेव्ही कॅ.कार्पाेरल पौलभाटिया, ए.के.पाठक, १९७१ च्या युद्धात सहभागी असलेले सैनिक एजाज शेख, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त केंद्रे, पोलीस अधीक्षक सावंत, शिवाजी चौधरी, गाडेकर, संभाजी गुठ्ठे, जगमोहनसिंग घायाळ, मे.बी.एस.पाठक यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना नगरसेवक भारसाखळे म्हणाले, मागील ४ वर्षांपासून कारगिल स्मृतिवन येथे विजय दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येतो. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी. हेच या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी सिव्हिल रिस्पॉन्स टीमच्या के. नताशा जरिन, स्रेहा बक्षी, चार्टर्ड अकाऊंटंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय राठी, अगली गु्रप आॅफ औरंगाबादचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोविंद केंद्रे यांनी केले. राहुल चौतमल व चमूने देशभक्तीपर गिते सादर केली. यशस्वीतेसाठी पंडित केंद्रे, जसवंतसिंग राजपूत, चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.