शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मॉडर्न मार्केटची प्रतीक्षा

By admin | Updated: November 29, 2014 00:31 IST

औरंगाबाद : मॉडर्न मार्केट उभारण्यासाठी कृषी पणन मंडळाने कृ.उ.बा. समितीची जाधववाडी येथील ५० एकर जमीन संपादन केली होती.

औरंगाबाद : मॉडर्न मार्केट उभारण्यासाठी कृषी पणन मंडळाने कृ.उ.बा. समितीची जाधववाडी येथील ५० एकर जमीन संपादन केली होती. मात्र, ५ वर्षे झाली तरी अजूनही येथे कंपाऊंड वॉल बांधण्याशिवाय दुसरे काम झाले नाही. एकीकडे किराणा मार्केट, फूल बाजार, कडबा व गुरांचा बाजार सुरूकरण्यासाठी बाजार समितीकडे जागा नाही. दुसरीकडे ५० एकर जमीन पडीत असून वेळेवर मॉडर्न मार्केटची उभारणी सुरू न झाल्याने येथील विकास खुंटला आहे. आज मॉडर्न मार्केट सुरू झाले असते, तर दुष्काळातही शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला भाव मिळाला असता. कृषी उत्पन्न बाजार समितीने स्टेट बँक आॅफ इंडियामधून घेतलेल्या कर्जाची रक्कम थकल्याने बँकेने डीआरटी न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाने बाजार समितीची गट क्र. ०१, ०२ (जाधववाडी) व हर्सूल येथील १३५ व १३७ मधील एकूण १५.१५ हेक्टर जागेचा लिलाव करण्याचे आदेश दिले. मात्र, राज्य कृषी पणन मंडळाने १४ कोटी ३३ लाख रुपये बाजार समितीच्या वतीने न्यायालयात भरले आणि बाजार समितीची जागा वाचविली. या बदल्यात बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने जाधववाडीतील १५.१५ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय ७ जून २०१० रोजी घेतला. या जागेची किंमत २५ कोटी ७५ लाख ५० हजार रुपये ठरविण्यात आली. उर्वरित रक्कम पणन मंडळाने द्यावी, असा संचालक मंडळाने ठराव पास केला. सुरुवातीला कृषी पणन मंडळाने जाधववाडीत प्रथम टर्मिनल मार्केट बनविण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ५० एकर जागा बाजार समितीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कृ.उ.बा.कडे केली होती. बाजाराचा विकास होणार असल्याने कृ.उ.बा.ने उर्वरित जागा पणन मंडळाला दिली. कृषी पणन मंडळाने जाधववाडीत मॉडर्न मार्केट उभारण्याची घोषणा केली. यानंतर पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद आकरे व शिष्टमंडळाने २ डिसेंबर २०१२ रोजी बाजार समितीला भेट दिली होती. येथील जागेची पाहणी करून मॉडर्न मार्केटचा खाजगी कंपनीकडून आराखडा तयार करून घेण्यात येणार होता. मात्र, अजूनही मॉडर्न मार्केटच्या उभारणीसाठी कोणतीच हालचाल कृषी पणन मंडळाने केली नाही.