शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा यादी वाढतेय; पण विशेष रेल्वेंचा पत्ताच नाही, उन्हाळी सुट्यांत गर्दीतून प्रवासाची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 17:17 IST

यंदा मार्चअखेर येत असतानाही विशेष रेल्वेंसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळी सुट्यांच्या तोंडावर रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांची लगबग वाढली असताना विविध मार्गांवरील रेल्वेंचे आरक्षण झपाट्याने फुल्ल होत आहे. मात्र, या वाढत्या प्रवासी ताणाचा विचार करूनही दक्षिण मध्य रेल्वेकडून छत्रपती संभाजीनगरमार्गे अद्याप उन्हाळी विशेष रेल्वे जाहीर करण्याकडे दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात प्रवाशांना बहुधा तुडुंब गर्दीतूनच प्रवास करावा लागेल.

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यांत रेल्वे प्रवाशांची संख्या वाढते. यंदा मार्चअखेर येत असतानाही विशेष रेल्वेंसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. विशेषतः मुंबई, नांदेड, हैदराबादकडे जाणाऱ्या रेल्वेंमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. परिणामी, अनेक प्रवाशांचे आरक्षण वेटिंगमध्ये अडकले आहे. विद्यार्थ्यांच्या सुट्या आणि पर्यटनामुळे पुढील काही आठवड्यांत प्रवाशांची संख्या आणखी वाढणार असल्याने विशेष रेल्वेंची मागणी होत आहे.

या रेल्वेंचे आरक्षण ‘वेटिंग’वरमुंबईकडे जाणारी राज्यराणी, वंदे भारत एक्स्प्रेस, जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसचे आरक्षण आताच ‘वेटिंग’वर गेले आहे. सचखंड एक्स्प्रेसचेही आरक्षण भरले आहे.

विशेष रेल्वेंचा विसरदरवर्षी विविध ठिकाणांसाठी अनेक उन्हाळी विशेष रेल्वे सुरू केल्या जातात; परंतु यावर्षी आजपर्यंत नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर शहरातून एकही विशेष रेल्वे सुरू करण्यात आलेली नाही. नांदेड विभागाने परभणी-मनमाडमार्गे नांदेड-बिकानेर एक्स्प्रेस सुरू करणे अत्यावश्यक आहे. उन्हाळी विशेष रेल्वे म्हणून नांदेड-पनवेल एक्स्प्रेस, नांदेड-कोल्हापूर साप्ताहिक एक्स्प्रेस, नांदेड-अयोध्या साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करावी. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर दरम्यान एकही विशेष रेल्वे उपलब्ध नाही.-दयानंद दीक्षित, सदस्य, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, सदस्य, परभणी

कोल्हापूरपर्यंत विस्तार कराउन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांच्या सुविधेसाठी गोरखपूर, जोधपूर, कोलकाता, नागपूरमार्गे बुद्धगयेसाठी विशेष रेल्वे सोडली पाहिजे. तपोवन एक्स्प्रेसच्या धर्तीवर मुंबईसाठी सुपरफास्ट पॅसेंजर सोडली पाहिजे. नांदेड-हडपसर एक्स्प्रेसचा विस्तार कोल्हापूरपर्यंत केला पाहिजे.- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना

English
हिंदी सारांश
Web Title : Waiting lists surge, special trains missing: Summer travel woes loom.

Web Summary : Summer rush overwhelms trains; waiting lists grow for Mumbai, Hyderabad routes. No special trains announced for Chhatrapati Sambhajinagar, despite passenger demand. Passengers face overcrowded travel.
टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर