दौलताबाद किल्ल्याच्या मागील डोंगराला विकासाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:04 IST2021-07-29T04:04:21+5:302021-07-29T04:04:21+5:30

दौलताबाद : ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याच्या पाठीमागील बाजूला सुमारे शंभर ते सव्वासे एकरात डोंगर वसलेला आहे. सदर डोंगरावर छोटे-मोठे नाल्यांचा ...

Waiting for development on the hill behind Daulatabad fort | दौलताबाद किल्ल्याच्या मागील डोंगराला विकासाची प्रतीक्षा

दौलताबाद किल्ल्याच्या मागील डोंगराला विकासाची प्रतीक्षा

दौलताबाद : ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याच्या पाठीमागील बाजूला सुमारे शंभर ते सव्वासे एकरात डोंगर वसलेला आहे. सदर डोंगरावर छोटे-मोठे नाल्यांचा प्रवाह असून, बंधारादेखील आहे. ही जमीन व डोंगराचा भाग किल्ल्याच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या किल्ल्यावरील जैवविविधता अबाधित राखून कास पठाराच्या धर्तीवर या डोंगराचादेखील विकास करावा, अशी मागणी केली जात आहे.

ऐतिहासिक वारसा असलेल्या दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात विपुल प्रमाणात वनसंपदा आहे. किल्ल्याच्या अखत्यारितच मागील बाजूस एक डोंगर असून, सुमारे शंभर एकराच्या आवारात हा डोंगर आहे. या डोंगराचा विकास करून वनसंपदेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने पर्यावरणप्रेमींची मागणीदेखील वाढली आहे. ज्या जिल्हाधिकारी कार्यालय व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कास पठाराच्या धर्तीवर कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्यात झक्कास पठार उभारण्याचे काम सुरू आहे. त्याच धर्तीवर दौलताबाद येथील या डोंगराचा विकास व्हावा, अशी मागणी केली जात आहे.

----

संवर्धनची गरज

दौलताबादच्या या डोंगरावर दरवर्षी शहरातील विविध संस्था, शाळा व शासकीय अधिकारी वृक्षलागवडीचा सोपस्कार पूर्ण करतात. परंतु त्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी मात्र कोणी घेत नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर व पर्यावरणप्रेमींकडून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.

Web Title: Waiting for development on the hill behind Daulatabad fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.