व्होटर स्लिपच प्रभावी

By Admin | Updated: May 12, 2014 00:00 IST2014-05-11T23:52:00+5:302014-05-12T00:00:18+5:30

प्रसाद आर्वीकर , परभणी या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेमध्ये ६४ टक्के मतदारांनी व्होटर स्लिप दाखूवन मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Voort Slipch Effective | व्होटर स्लिपच प्रभावी

व्होटर स्लिपच प्रभावी

 प्रसाद आर्वीकर , परभणी या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेमध्ये ६४ टक्के मतदारांनी व्होटर स्लिप दाखूवन मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने दिलेली व्होटर स्लिपच ओळखपत्रांत प्रभावी ठरली. यावेळेसच्या निवडणुकीत जिल्हा प्रशासना मोठ्या प्रमाणात मतदार जागृती कार्यक्रम राबविला होता. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित केल्याने या मतदारसंघात मतांचा टक्का वाढला. निवडणुकीच्या पूर्वीपासूनच जिल्हा प्रशासनाने मतदार जागृती केली. निवडणुकीदरम्यानही एकीकडे उमेदवार मंडळी प्रचार करीत असताना दुसरीकडे जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मतदार जागृती करीत होते. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याच्या मतदार यादीतील ९० टक्के मतदारांना व्होटर स्लिप देण्याचे काम या विभागाने केले. ही व्होटर स्लिप मतदान ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार होती. जिल्ह्यातील बी.एल.ओं.मार्फत घराघरात पोहोचलेल्या या व्होटर स्लिपचा मतदारांनी उपयोग घेत व्होटर स्लिप दाखवूनच मतदान केले. मतदाना दरम्यान कोणता मतदार कोणते ओळखपत्र दाखवून मतदान करतो, याची नोंद घेण्यात आली. ही नोंद घेतल्यानंतर सहाही विधानसभा मतदार संघाची आकडेवारी समोर आली. त्यात केवळ घनसावंगी आणि परतूर हे जिल्ह्याबाहेरील दोन विधानसभा मतदार संघ वगळता या जिल्ह्यातील चारही मतदार संघात जिल्हा प्रशासनाने दिलेली व्होटर स्लिप दाखवूनच मतदान केले. जिंतूरमध्ये सर्वाधिक सर्वात जास्त प्रतिसाद जिंतूर या मतदारसंघात मिळाला. मतदारसंघात ११ लाख ५९ हजार ३७५ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी ७९ टक्के मतदारांनी व्होटर स्लिप दाखवून मतदान केले. त्यामुळे जिल्ह्यात मतदार जागृती कार्यक्रम यशस्वी ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. बी.एल.ओं.ना श्रेय सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करणे, नावातील दुरुस्त्या करणे, मतदारांची छायाचित्र उपलब्ध करणे आणि त्यानंतर व्होटर स्लिप मतदारांपर्यंत पोहोचती करणे, हे काम जिल्ह्यातील ब्लॉक लेव्हल आॅफीसर्स (बीएलओ) यांनी चोख बजावले. त्यांच्या कामामुळेच ६४ टक्के मतदारांनी व्होटर स्लिप दाखवून मतदान केले. त्यामुळे याचे सर्वाधिक श्रेय बीएलओंना जाते. ओळखपत्रांचा केलेला वापर वापरलेले ओळखपत्र विधानसभामतदान कार्ड व्होटर स्लिप इतर ओळखपत्र एकूण जिंतूर४१८१०१७११२३३५८६२१६५१९ परभणी४०१२४१३०७२३३८५७१७४७०४ गंगाखेड६१४६७१५०३५२१४४१४२२६२३३ पाथरी३७६९५१६९२५४८५७९२१५५२८ परतूर७११५७७४४०७८९७७१५४५४१ घनसावंगी१११४९३४८७६८११५८९१७१८५० एकूण३६३७४६७४४६२७५१००२११५९३७५ अशी होती व्होटर स्लिप परभणी जिल्ह्यातील मतदार यादी मतदारांच्या फोटोसह अद्ययावत करण्यात आली. जवळपास ९० टक्के मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत उपलब्ध होते. या यादीवरुन प्रत्येक मतदाराला त्याचे नाव, मतदारसंघाचे नाव, यादीतील मतदार क्रमांक यासह मतदान केंद्राच्या पत्त्यासह व्होटर स्लिप देण्यात आली होती. ती ओळखपत्र म्हणून वापरता आली.

Web Title: Voort Slipch Effective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.