शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

कर्मचाऱ्यांच्या मतदान हक्काचे होतेय उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 19:37 IST

औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल 

ठळक मुद्देपुढील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी 

औरंगाबाद : निवडणूक कामावरील कर्मचारी मतदानापासून वंचित राहत असल्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल झाली आहे. सदर याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने मंगळवारी (दि.२४) नवी दिल्ली येथील केंद्रीय निवडणूक आयोग, मुंबई येथील मुख्य निवडणूक अधिकारी आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निर्वाचन अधिकारी यांना ‘ई-मेलद्वारे’ नोटीस बजावण्याचा आदेश दिला. या जनहित याचिकेची पुढील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. 

ही जनहित याचिका आशा जंगम, अशोक गिते व इतरांनी अ‍ॅड. बी.एल. सगर किल्लारीकर यांच्यामार्फत दाखल केली. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार एप्रिल-मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने मतदान व इतर कामांसाठी १३,५६७ अधिकारी नियुक्त केले होते. त्याशिवाय, इतर कर्मचारी, पोलीस, होमगार्ड, खाजगी वाहन चालक, वगैरे मिळून जवळपास २८ हजार कर्मचारी कार्यरत होते. यातील अनेक कर्मचारी स्वत: मतदार असून, त्यांना मतदानाचा अधिकार आहे; परंतु ते निवडणुकीच्या कामावर असल्यामुळे त्यांना संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावता येत नाही. निवडणूक कायदा, नियम व निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अशा मतदारांसाठी ‘पोस्टाने मतपत्रिका’ पाठवण्याची पूर्वतयारी संबंधित जिल्ह्यातील मुख्य मतदान अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी करणे आवश्यक आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देताना त्यांच्याकडून फॉर्म नं. १२ भरून घेऊन त्यांच्यासाठी ‘पोस्टाने मतपत्रिका’ पाठविणे किंवा ‘निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र’ देऊन त्यांच्या मतदानाची व्यवस्था करणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. 

मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात याची अंमलबजावणी झाली नाही. फक्त ५५१३ मतपत्रिका ‘पोस्टाने’ पाठविल्या. त्यातील, फक्त २२५० पोस्टाने पोहोचत्या झाल्या, उर्वरित मतपत्रिका ‘अपूर्ण पत्ता’ म्हणून पोहोचल्या नाहीत. म्हणून ‘पोस्टाने प्राप्त मतपत्रिका/मतदान’ फक्त १७७२ इतकेच झाले. म्हणजेच इतर सर्व कर्मचाऱ्यांचा मतदानाचा हक्क, त्यांची चूक नसतानाही डावलला गेला. म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली. 

याचिकाकर्त्यांचे मतभारतीय संविधान, निवडणूक कायदा व नियमानुसार सर्व नागरिकांना एक समान ‘मतदानाचा हक्क’ आहे. निवडणूक आयोग ‘मतदार जागृती’ या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून जाहिरात करते. मात्र, निवडणूक कार्यक्रम राबविण्यात सहभागी कर्मचाऱ्यांच्या मतदानाच्या हक्काचे उल्लंघन करीत आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :VotingमतदानAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबाद