शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Video: वाहतूक पोलिसाची दबंगगिरी, भरचौकात तरुणाला घातल्या लाथा

By बापू सोळुंके | Published: May 20, 2023 6:38 PM

शहरातील सर्वात महत्वाचा आणि कायम वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीचौकातील घटना

छत्रपती संभाजीनगर: वाहतूक नियमन करणाऱ्या शहर वाहतूक शाखेच्या एका पोलिसाने तरूणाला लाथा, चापटाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास क्रांतीचौकात घडली. ही घटना तेथून जाणाऱ्या वाहनचालकाने मोबाईलमध्ये क्लीप केली. या घटनेची व्हिडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या कृतीविषयी संताप व्यक्त होत आहे.

शहरातील सर्वात महत्वाचा आणि कायम वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीचौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी,कर्मचारी वाहतूक नियमन करण्यासाठी सदैव तैनात असतात. वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रदीप चव्हाण आणि पोलीस काँन्स्टेबल शहा यांची शनिवारी वाहतूक नियमनाची ड्युटी होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास हवालदार चव्हाण यांना काहीतरी विचारणा करणाऱ्या एका तरूणाला चव्हाण यांनी लाथा मारल्या.एवढेच नव्हे तर त्याला त्यांनी चापटाने बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार तेथे उपस्थित असलेल्या शेकडो वाहनचालकांसमोर झाला. विशेष म्हणजे कोणीही त्यांना अडविले नाही. पोलीस कॉन्स्टेबल शहा यांनी चव्हाण यांना रोखण्याऐवजी त्या तरूणालाच काहीतरी समजावून सांगत असल्याचे व्हिडिओ क्लीपमध्ये दिसते. यानंतर तो तरूण तेथील उड्डाणपुलाच्या पिलच्या ओट्यावर जाऊन बसतो. तेथेही चव्हाण यांनी त्याला सुनावल्याचे दिसत होते. या घटनेची मात्र कोणतीही नोंद शनिवारी रात्री उशीरापर्यंत क्रांतीचाैक पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती.

तरुण दारू पिलेला होतातो तरूण दारू पिलेला होता. त्याला महावीर चौकाकडे जायचे होते. मात्र त्याचवेळी लाल सिग्नल लागल्याने त्याला थांबावे लागल्याने त्याचा त्याला राग आला.  तो रागाच्या भरात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांकडे आला आणि तुम्ही सिग्नला का बंद केले, असे म्हणून त्याने वाद घातल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. - प्रदीप कठाने, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस