अल्पवयीन मुलींचा व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल; आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 20:42 IST2020-01-22T20:40:26+5:302020-01-22T20:42:25+5:30
न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश सुनावले आहेत.

अल्पवयीन मुलींचा व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल; आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी
आखाडा बाळापूर : शिकवणीला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचा व्हिडीओ तयार करून टिकटॉकवर व्हायरल करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश सुनावले आहेत.
कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील दोन तरुणांनी अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिची इच्छा नसताना तिचा पाठलाग केला. तिची छेड काढली. आॅटो पॉर्इंटवर एका पानटपरीत लपून मोबाईलने तिचा व्हिडिओ बनवला. टिकटॉकवर व्हायरल केला. याप्रकरणी सदर मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्यरात्रीच पोलीस निरीक्षक विकास थोरात, जमादार संजय मार्के, गजानन भालेराव, भगवान वडकिल्ले यांनी आरोपी आरिफ खान करीम खान पठाण व अम्मू ऊर्फ आमिर खान अब्दूल गफार खान या दोघांनाही जवळा पांचाळ येथून अटक केली. आज २० जानेवारी रोजी त्यांना वसमतच्या न्यायालयापुढे हजर केले असता २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली होती.