Video: रुग्णालयातून हातकडीसह पळाला कैदी; पाठलागानंतर नालीत उडी घेतली अन् अडकला
By सुमित डोळे | Updated: June 26, 2023 15:47 IST2023-06-26T15:37:34+5:302023-06-26T15:47:25+5:30
अपघात विभागाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांच्या हाताला झटका देऊन कैदी हातकडीसह पळाला.

Video: रुग्णालयातून हातकडीसह पळाला कैदी; पाठलागानंतर नालीत उडी घेतली अन् अडकला
छत्रपती संभाजीनगर: जालना येथून शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारासाठी आणले असता कैद्याने हातकडीसह पलायन केल्याची धक्कादायक घटना दुपारी दीड वाजता घडली. मात्र, पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी पाठलाग करत कैद्याला अवघ्या काही वेळातच पुन्हा ताब्यात घेतले.
लखन प्रल्हाद मिसाळ असे कैद्याचे नाव आहे. जालन्यात ऑक्टोबर २०२२ मध्ये लखन याचायार खुनाचा प्रयत्न करणे आणि पिस्तुल बाळगण्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. पोलिसांनी त्यास लागलीच ताब्यात घेतले. तेव्हापासून तो जालना येथे कारागृहात होता. काही दिवसांपासून लखने छातीत, पाठीत दुखत असल्याचे सांगितले. यामुळे त्यास तपासणीसाठी जालना येथून शासकीय रुग्णालय घाटी येथे आणण्यात आले. अपघात विभागाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांच्या हाताला झटका देऊन लखन हातकडीसह पळाला.
छत्रपती संभाजीनगर: खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यातील आरोपी घाटी रुग्णालयातून हातकडीसह पळाला, पाणचक्कीजवळ नाल्यात उडी मारली अन् अडकला... #CrimeNews#ChhatapatiSambhajinagarpic.twitter.com/MIlOXcguiU
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) June 26, 2023
दरम्यान, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाने त्याचा पाठलाग सुरु केला. लखन पानचक्कीच्या दिशेने पळत सुटला. आपला पाठलाग होत असलायचे लक्षात येताच त्याने पानचक्की जवळील पुलाववरून खाली उडी घेतली. मात्र, यावेळी तो जखमी झाला. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी लागलीच त्यास ताब्यात घेतल. सध्या त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.