Video: नाथषष्टीनिमित्त भाविकांचा ओढा पैठणकडे; 'लाल परी'मध्ये अभंग, भक्तीगीतांचा स्वर
By संतोष हिरेमठ | Updated: March 13, 2023 16:01 IST2023-03-13T16:00:35+5:302023-03-13T16:01:07+5:30
मध्यवर्ती बसस्थानकात मंडप टाकून पैठणला जाणाऱ्या बसेसची माहिती भाविकांना दिली जात आहे.

Video: नाथषष्टीनिमित्त भाविकांचा ओढा पैठणकडे; 'लाल परी'मध्ये अभंग, भक्तीगीतांचा स्वर
छत्रपती संभाजीनगर : नाथषष्टीनिमित्त पैठण येथे जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीने मध्यवर्ती बसस्थानक फुलून गेले आहे. एसटी महामंडळातर्फे भाविकांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. अभंग, भक्तीगीत म्हणत भाविक पैठणच्या दिशेने रवाना होत आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकात मंडप टाकून पैठणला जाणाऱ्या बसेसची माहिती भाविकांना दिली जात आहे. आगार व्यवस्थापक अविनाश साखरे, स्थानक प्रमुख संतोष नजन यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक भाविकांच्या सुविधेसाठी प्रयत्नशील आहेत.