शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या दावणीला थेट विदर्भातील चारा !

By admin | Updated: January 4, 2016 00:08 IST

संजय तिपाले , बीड खरीप हंगामात अपेक्षित चारा उत्पादन न झाल्याने गुरांना जगविणे दिवसेंदिवस मुश्किल बनू लागले आहे. दुष्काळामुळे नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील चारा संपला आहे.

संजय तिपाले , बीडखरीप हंगामात अपेक्षित चारा उत्पादन न झाल्याने गुरांना जगविणे दिवसेंदिवस मुश्किल बनू लागले आहे. दुष्काळामुळे नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील चारा संपला आहे. त्यामुळे छावण्यांमधील गुरांसाठी थेट विदर्भातून चारा उपलब्ध करण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यात ८ लाख २२ हजार ३६४ इतकी गुरे आहेत. अल्पपर्जन्यमानामुळे आॅगस्ट २०१५ पासूनच चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात छावण्यांना सुरुवात झाली. आजघडीला मंजूर छावण्यांची संख्या १०३ इतकी आहे. त्यापैकी ८६ छावण्या सुरु असून ५४ हजारावर जनावरे आश्रयाला आहेत. बहुतांश छावण्यांमध्ये गुरांना चारा म्हणून ऊस दिला जात आहे. मात्र, आता ऊसाचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. अडीच हजार रुपये टन एवढ्या दरानेही ऊस देण्यास उत्पादक तयार नाहीत. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये चाराटंचाईची स्थिती बीडपेक्षा वेगळी नाही. त्यामुळे चाऱ्याची जमवाजमव करण्यासाठी छावणीचालकांना मराठवाड्याबाहेर जावे लागले आहे.बीड तालुक्यातील पालवण येथील यशवंत बहुद्देशीय संस्थेच्या छावणीत दोन दिवसांपूर्वीच अमरावतीतून ७० टन तुरीचे भुस्कट आणले आहे. वाहतूक खर्चासह प्रतिटन ९ हजार रुपये मोजावे लागले आहेत. बीडमध्ये यंदा सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा आहे. मात्र, पावसाअभावी वाढ खुंटली असून ज्वारीचे बाटूक झाले आहे. ४ लाख १८ हजार मे. टन एवढाच चारा ज्वारीपासून उपलब्ध होऊ शकतो. काढणी नसल्यामुळे चाराटंचाई अधिक तीव्र होणार आहे. तथापि, सतत ऊस खाल्ल्याने जनावरांना पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विदर्भातून मागविले जाणारे भुस्कट तूर्त ऊसाला पर्याय मानले जात आहे.