शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

मुदखेडातील मोकाट कुत्र्यांनी घेतला सुजय भोसकरचा बळी

By admin | Updated: July 5, 2014 00:42 IST

मुदखेड : येथील पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला. मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने सुजय भोसकर या विवाहित तरुणांचा नाहक बळी गेल्याची घटना ४ जुलै रोजी घडली.

मुदखेड : येथील पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला. मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने सुजय भोसकर या विवाहित तरुणांचा नाहक बळी गेल्याची घटना ४ जुलै रोजी घडली.जवळपास दीड महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी लघूशंकेनिमित्त सुजय भोसकर (वय ३२) हे उठले होते. यादरम्यान त्यांचा पाय एका कुत्र्यावर पडला, त्याच कुत्र्याने सुजय यांच्या पायाला चावा घेतला. सुजयने लगेच मुदखेडचे शासकीय रुग्णालय गाठले आणि रेबीजचे इंजेक्शन टोचून देण्याची विनंती केली, मात्र मुदखेडच्या रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन नसल्याने डॉक्टरांनी सुजय यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात जावून रेबीजचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, यातच २ जुलै सायंकाळी रोजी पाणी घेवून तोंड धुताना सुजय यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना ३ जुलै रोजी सकाळी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. सुजय भोसकर यांना ‘रेबीज’ झाल्याचे निदान झाल्याने डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सुजय यांना सायंकाळी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, ४ जुलै रोजी पहाटे ३.२० च्या दरम्यान उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. औरंगाबाद येथून शववाहिनीने त्यांचे शव सकाळी १०.३० च्या दरम्यान मुदखेड येथे आणण्यात येवून दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ सुशांत यांनी भडाग्नी दिला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मुदखेड येथील डॉ. सखाराम ऊर्फ बंडू भोसकर यांचे ते द्वितीय चिरंजीव होत. (वार्ताहर)मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा- नागरिकांचे साकडे दरम्यान, सुजय भोसकर यांच्या अकाली निधनाने मुदखेडकरांना धक्का बसला. मुदखेडच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा. मुदखेडातील मोकाट कुत्र्यांबद्दल नागरिकांनी वेळोवेळी पालिकेचे लक्ष वेधले, मात्र पालिकेने दुर्लक्ष केल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या मुदखेडात प्रचंड वाढली आहे. अशाच कुत्र्यांनी चावा घेतल्याने सुजय भोसकर यांचा बळी गेला. या घटनेनंतरही पालिका जागे होणार की नाही? मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार की नाही? असा संतप्त सवाल मुदखेडकर जनता पालिकेला करीत आहे.