पाण्याच्या टँकरने घेतला तरुणाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:10 IST2019-06-07T23:10:01+5:302019-06-07T23:10:13+5:30

भरधाव विना क्रमांक असलेल्या पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय तरुण जागीच ठार झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

The victim is the victim of water tanker | पाण्याच्या टँकरने घेतला तरुणाचा बळी

पाण्याच्या टँकरने घेतला तरुणाचा बळी

चित्तेपिंपळगाव : भरधाव विना क्रमांक असलेल्या पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय तरुण जागीच ठार झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बीड हायवे कचनेर फाट्यावर दुपारी ४-३० च्या दरम्यान घडली.


काद्राबाद गावाकडून पाण्याने भरलेले टँकर अडुळकडे जात होते. दुचाकीस्वार पैठणहुन फुबंब्री तालुक्यातील निमखेडा येथे जात होते. विनाक्रमांक असलेल्या टँकरने कचनेर उड्डाणपुलाखाली दुचाकीला (एम.एच.२० इ.एम.०४९९) जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार दत्ता परभत फुके (३२) हा जागीच ठार झाला तर राहुल फुके (२५) जखमी झाला. घटनेनंतर टँकर चालक फरार झाला.

अ‍ॅम्ब्युलन्स चालक दीपक तायडे यांनी जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. चिकलठाणा पोलिसांनी विना क्रमांक पाण्याचे टँकर व दुचाकी जप्त केले. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The victim is the victim of water tanker