छत्रपती संभाजीनगर मनपा आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का, इच्छुकांचा जल्लोष!
By मुजीब देवणीकर | Updated: November 11, 2025 17:22 IST2025-11-11T17:21:00+5:302025-11-11T17:22:16+5:30
दहा वर्षानंतर महापालिकेची निवडणूक शहरात होत आहे. ती सुद्धा प्रभाग पद्धतीने

छत्रपती संभाजीनगर मनपा आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का, इच्छुकांचा जल्लोष!
छत्रपती संभाजीनगर: महापालिका निवडणूकीसाठी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी समर्थकांसह अलोट गर्दी केली होती.
सोडतीत शिंदेसेनेत अलीकडेच प्रवेश केलेले माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा पत्ता कट झाला. त्यांना आता पर्यायी प्रभाग शोधावा लागेल. त्यांच्या हक्काच्या प्रभागातील एक जागा ओबीसी महिलेसाठी आरक्षीत झाली. या ठिकाणी माजी महापौर अनिता घोडेले निवडणूक लढवू शकतात. त्याचप्रमाणे भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, विधानसभा निवडणूक लढविलेले राजु शिंदे, अलीकडेच भाजपात गेलेले कैलास गायकवाड यांनाही पर्यायी प्रभाग शोधावे लागणार आहेत.
दहा वर्षानंतर महापालिकेची निवडणूक शहरात होत आहे. ती सुद्धा प्रभाग पद्धतीने. या पद्धतीचा अनुभव राजकीय मंडळी आणि मतदार पहिल्यांदाच घेत आहेत. मागील काही दिवसांपासून इच्छुक आरक्षण सोडतीसाठी उत्सुक होते. आता सोडत संपल्यावर पुढील मोठी लढाई तिकीटासाठी राहणार आहे.
आरक्षणाचे चित्र:
अनुसूचित जाती (एसस्सी) – २२ – ११ (महिला) – जास्त लोकसंख्या असलेल्या २२ प्रभागात आरक्षण
अनुसूचित जमाती (एसटी ) – २ – १ (महिला)– २ प्रभागांमध्ये आरक्षण
मागासवर्गीय (ओबीसी) – ३१ – १६ – प्रत्येक प्रभागात १, दोन प्रभागात २ नगरसेवक
महिला (एकूण) – ५८ – सर्वसाधारण महिला सोडून आरक्षीत महिला नगरसेवक २८ आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक प्रभागात २ महिला नगरसेवक अनिवार्य आहे.
पक्षीय बलाबल २०१५
शिवसेना २८
भाजप २३
एमआयएम २४
काँग्रेस १२
अपक्ष १८
बीएसपी ०४
राष्ट्रवादी कॉं. ०४
रिपाइं (डे) ०२
एकूण ११५