शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

वसमत- नांदेड रस्त्यावर चालकाचे हातपाय बांधून जीप पळविली

By admin | Updated: July 8, 2014 00:37 IST

वसमत: भाड्याने घेतलेल्या कारच्या चालकाचे हातपाय बांधून त्यास रस्त्याच्या बाजूला टाकून जीप घेऊन पसार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली.

वसमत: भाड्याने घेतलेल्या कारच्या चालकाचे हातपाय बांधून त्यास रस्त्याच्या बाजूला टाकून जीप घेऊन पसार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. वसमत-नांदेड महामार्गावरील माळवटा पाटीजवळ हा प्रकार घडला आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील शेख फारूख यांची जीप क्र. एम. एच. २६ एन ५७८७ ही चार तरूणांनी रविवारी किरायाने घेतली. चालक आनंद लक्ष्मण चकटवार हा जीप चालवत होता. त्या तरूणांनी नांदेडहून परभणी असा प्रवास केला व परभणीहून परत येत असताना रात्री साडेबाराच्या सुमारास वसमत जवळील माळवटा पाटीजवळ गाडी थांबवली. एक जण गाडीतून उतरून लघूशंकेसाठी गेला व तेथे जाऊन आरडाओरड सुरू केली. ते ऐकून गाडीतील अन्य तरूण व चालक गाडीतून उतरले व त्यावेळी चौघांनी चालकास मारहाण त्याच्या तोंडावर पट्टी बांधली. हातपाय बांधून डोळ्यात मिरचीची पूड टाकून ते तरूण कार घेऊन फरार झाले. चालक काही वेळाने सुटका करून रस्त्यावर आला असता त्यास वसमत पोलिसांचे गस्तीवर असलेले वाहन दिसले. घडलेला प्रकार चालकाने पोलिसांना सांगितला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी चालक आनंद चकटवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात ६ लाख ५० हजार रुपयांची कार चोरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाची नोंद वसमत ग्रामीण पोलिसांनी घेऊन प्रकरण बिलोली पोलिसांकडे वर्ग केला असल्याची माहिती सपोनि सुनील नाईक यांनी दिली. (वार्ताहर)