शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

घाटीचे डॉक्टर संपावर

By admin | Updated: October 8, 2014 01:08 IST

औरंगाबाद : घाटीतील निवासी डॉक्टरला सोमवारी रात्री रुग्णाच्या नातेवाईकांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाली. या घटनेनंतर घाटीतील सुमारे २४० निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.

औरंगाबाद : घाटीतील निवासी डॉक्टरला सोमवारी रात्री रुग्णाच्या नातेवाईकांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाली. या घटनेनंतर घाटीतील सुमारे २४० निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. या संपाचा फटका तेथे उपचार घेत असलेल्या सामान्य रुग्णांना बसला. सोमवारी नियोजित करण्यात आलेल्या सुमारे ४० शस्त्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घाटी प्रशासनाला घ्यावा लागला. वॉर्ड क्रमांक २५ मध्ये अ‍ॅडमिट असलेल्या ८ वर्षीय मुलीच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती डॉक्टरांनी तिच्या आईला दिली. डॉक्टरांनी माहिती देताच त्या मुलीच्या आईला मानसिक धक्काच बसला. त्यानंतर ती आरडाओरड क रू लागली. नातेवाईक तिला घेऊन अपघात विभागात आले. मेडिसीन विभागातील निवासी डॉक्टर हेमंत चिमुटे यांनी तिला तपासले आणि एक इंजेक्शन दिले. त्यानंतर ते दुसऱ्या रुग्णावर उपचार करू लागले. तेव्हा तिच्यासोबत असलेल्या ५ ते ६ नातेवाईकांनी डॉ. हेमंत यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेला आणि नातेवाईकांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी तेथे सुरक्षारक्षकही उपस्थित होते. मात्र, त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप मार्ड संघटनेने घेतला. या घटनेची माहिती सर्व निवासी डॉक्टरांना मिळताच त्यांनी मध्यरात्रीपासूनच काम बंद आंदोलन सुरू केले. सर्व निवासी डॉॅक्टर जमा झाले आणि त्यांनी बेगमपुरा ठाणे गाठून मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार नोंदविली. घाटीचे अधिष्ठाता, मेडिसीन विभागप्रमुख, वैद्यकीय अधीक्षक हेसुद्धा बेगमपुरा ठाण्यात यावेळी उपस्थित होते.