शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित बेरोजगारास पाऊण लाखाचा गंडा

By admin | Updated: May 21, 2014 00:48 IST

नवीन नांदेड : सिंगापूर व दुुबई येथे नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याप्रकरणी ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 नवीन नांदेड : सिंगापूर व दुुबई येथे नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका २९ वर्षीय तरूणास ७७ हजार ४७४ रूपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू’ रोजगार जॉब्स कंपनी व ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू’ अलर्टस नोकरी कंपनीच्या प्रतिनिधींसह ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नांदेड परिसरातील एनडी-३२, हडको येथील रहिवासी ऋषिकेश पुरूषोत्तम पांडे यांच्या ‘भ्रमणध्वनी’वर ११ ते १४ जानेवारी २०१४ दरम्यान, ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू’ रोजगार जॉब्स कंपनी व ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू’ अलर्टस नोकरी कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासह अर्जुन कश्यप,करण जोहर, पंकज यादव व मोहित यांचा फोन आला. दरम्यान, ऋषिकेश पांडे यांना उपरोल्लेखित आरोपींनी बर्‍याचवेळा ‘भ्रमणध्वनी’वर संपर्क साधून सिंगापूर व दुबई येथे नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले़ त्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी करण्यात सांगीतली़ त्यानंतर पांडे यांना रोजगार जॉब्स कंपनीच्या नावाने पैसे भरण्यास सांगीतले़ पांडे यांनी त्यांच्या अ‍ॅक्सीस बँकेच्या खात्यातून ११ जानेवारी २०१४ रोजी १३ हजार २०० रूपये आणि १४ जानेवारी २०१४ रोजी १३ हजार ५४० रूपये भरले. एकूणच, आरोपींनी पांडे यांच्याकडून अनुक्रमे ५३ हजार ६६० व २३ हजार ८१४ असे एकूण ७७ हजार ४७४ रूपये घेतले़ परंतु कोणतीही नोकरी लावून दिली नाही़ आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ऋषिकेश पांडे यांनी ग्रामीण ठाणे गाठून फसवणूक झाल्याची तक्रार दिली़ त्यानुसार उपरोक्त सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला़ तपास सपोनि़ एम़टी़ कदम हे करीत आहेत़ मोबाईलवर संपर्क साधून फसव्या जाहिरातींद्वारे अनेकांची आर्थिक फसवणूक होते़ मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणारे सायबर चोरटे सक्रिय झाले आहेत़ असे कॉल्स व त्यांच्या आॅफर्सची शहानिशा करणे गरजेचे आहे़ विशेषत: हे कॉल्स विदेशातून असतील तर अधिक जागरुकता बाळगावी़ नागरिकांनी याबाबत दक्षता पाळावी असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे़ (वार्ताहर)