शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाळूचा बेसुमार उपसा सुरूच

By admin | Updated: May 29, 2014 00:23 IST

हिंगोली : जिल्ह्यातील तब्बल ४५ वाळू घाटांचा लिलाव झाला नसून या घाटातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू

हिंगोली : जिल्ह्यातील तब्बल ४५ वाळू घाटांचा लिलाव झाला नसून या घाटातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू असताना याप्रकरणी कारवाई करण्याऐवजी महसूल विभाग साखरझोपेतच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ८६ वाळू घाटांपैकी ४५ वाळू घाटांचा गतवर्षी लिलाव झाला नाही. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लिलाव न झालेल्या वाळू घाटातून बेसुमारपणे अवैध वाळू उपसा केला जात आहे. याबाबतची सत्यता पडताळून पाहण्यासाठी हिंगोली तालुक्यातील समगा, सावरखेडा, नर्सी नामदेव भागातील परिस्थितीचा आढावा घेतला असता येथील वाळू घाटातून अवैध वाळूचे उत्खनन केले जात असल्याचे दिसून आले. औंढा नागनाथ तालुक्यातील माथा, मेथा, येडूद, तपोवन, नालेगाव आदी भागातूनही अवैध वाळू उपसा करून ही वाळू परभणी जिल्ह्यात नेली जात असल्याचे दिसून आले. प्रातिनिधीक स्वरुपामध्ये काही वाळू घाटांचा आढावा घेतला असता ही स्थिती समोर आल्याने यावर नियंत्रण ठेवणारे महसूल विभागातील कर्मचारी व अधिकारी साखरझोपेतच आहेत की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या कामाचा व्याप असल्याचे कारण सांगून महसूल विभागातील अधिकारी याप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत होते. आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे या अधिकार्‍यांवर फारसा ताण नाही तरीही कारवाई करण्यास हे अधिकारी तयार नाहीत. विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकार्‍यांकडूनही याचा आढावाही घेतला जात नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)