मराठवाड्यास अवकाळीचा फटका; सात ठिकाणी वीज कोसळली, तिघांचा बळी
By विकास राऊत | Updated: April 8, 2023 17:27 IST2023-04-08T17:26:59+5:302023-04-08T17:27:14+5:30
छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक जण दगावला आहे.

मराठवाड्यास अवकाळीचा फटका; सात ठिकाणी वीज कोसळली, तिघांचा बळी
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून तिघांचा बळी गेला आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत. ७ ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या. छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक जण दगावला आहे. जखमीमध्ये ४ जण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत.
तसेच अवकाळी पावसामुळे चार लहान तर २७ मोठ्या जनावरांचा बळी घेतला. पिकांचे नुकसान झाले नाही, असे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये ८.९ मि.मी पाऊस झाला.जालना ४.९, परभणी ०.५, हिंगोली ०.१, नांदेड ४.९, बीड ०.३, लातूर ८.९, धाराशिव ०.६ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.