शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गावात अवैध बांधकाम केल्याने सरपंचासह सदस्यांचे पद रद्द...!

By admin | Updated: December 23, 2016 00:19 IST

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पेरजापूर ग्रामपंचयतीच्या सरपंच व सदस्यांनी गायरान जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या कारणावरून औरंगाबाद खंडपीठाने अपात्र ठरिवले आहे.

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पेरजापूर ग्रामपंचयतीच्या सरपंच व सदस्यांनी गायरान जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या कारणावरून औरंगाबाद खंडपीठाने अपात्र ठरिवले आहे. या बाबतची माहिती अशी पेरजापूर येथील सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक झाल्यानंतर आत्माराम खेकाळे यांनी सरपंच कासाबाई तळेकर व सदस्य कृष्णा बुरंगे यांच्याविरूध्द गट नबंर १८१ मध्ये गायरान जमिनीमध्ये बेकायदेशीर आऱ सी़सी़ बांधकाम केल्याची तक्रार केली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच व सदस्यांना अपात्र घोषित केले होते. १० जून २०१६ ला अप्पर जिल्हाधिकारी एन. आर शेळके यांनी अपात्र ठरविले होते. त्यानंतर सरपंच आणि सदस्यांनी औरंगाबाद विभागीय कार्यालयातून स्थगिती मिळविली होती. तक्रारकर्ता आत्माराम केकाळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली. त्यानंतर कोर्टाने ३० नोव्हेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवल. त्याला विभागीय आयुक्तानी स्थगिती दिली होती. त्यानंतर आखे पाटील यांनी उच्च न्यालयात धाव घेऊन सरपंच व सदस्य यांच्याविरूध्द अपील दाखल केले. त्यावर सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेऊन सरपंच कासाबाई तळेकर व कृष्णा बुरंगे यांचे सदस्यपद अपात्र घोषित केले आहे़ यासदंर्भात सरपंच कासाबाई केशवराव तळेकर यांना विचारले असता आम्ही या निर्णयाविरूध्द सर्वोच्च न्यायालय अपिल करणार असल्याचे सांगितले. याची नुकतीच कोर्टातून निकालाची कॉफी मिळाल्याचे सांगण्यात येते. (वार्ताहर)