शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

विद्यापीठातील ‘पदव्यूत्तर‘चे प्रवेश ऑनलाईन होणार; प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 15:24 IST

या वर्षी ‘एम.फिल प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने यशस्वीपणे राबविण्यात आली.

ठळक मुद्दे२२ ते ३१ डिसेंबरपर्यंत  ऑनलाईन नोंदणीविद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल.

औरंगाबाद  :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून (दि.२२) सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, औरंगाबाद मुख्य परिसर तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाईन होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल.

विद्यापीठात या वर्षी ‘एम.फिल प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने यशस्वीपणे राबविण्यात आली. यानंतर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील सर्व ४५ विभाग तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व १० विभागातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची ‘ऑनलाईन‘ प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भात कुलगुरु प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ , प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ.दिगंबर नेटके यांच्या उपस्थितीत वेळोवेळी बैठक होऊन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक घोषित करण्यात आले.

२२ ते ३१ डिसेंबरपर्यंत  ऑनलाईन नोंदणी

यानूसार २२ ते ३१ डिसेंबर या दरम्यान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल. २ जानेवारी रोजी प्राथमिक यादी तर ६ जानेवारी २०२० रोजी प्रवेशित विद्यार्थ्यांची पहिली यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. १८ जानेवारी रोजी दुसरी यादी तर २३ जानेवारी रोजी तृतीय यादी व स्पॉट अ‍ॅडमिशन देण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागाच्या तासिका १८ जानेवारीपासून सुरु करण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागातील विषय, उपलब्ध प्रवेशित जागा, आरक्षण, शुल्क, पात्रता आदी सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

असे आहेत विद्यापीठातील पदव्यूत्तर अभ्यासक्रम :  - एम.ए. :  मराठी, हिंदी, ऊर्दु, पाली व बुध्दीझम, संस्कृत, स्त्री अभ्यास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, इतिहास, भुगोल, विदेशी भाषा, मानसशास्त्र, अर्कालॉजी, फुले-आंबेडकर विचारधारा, योगशास्त्र, संगीत, बी.पी.ए, आजीवन शिक्षण व विस्तार- एम.एस्सी : पदार्थविज्ञान, प्राणीशास्त्र, इलेक्ट्रानिक्स, रसायनशास्त्र, जीव रसायनशास्त्र, संख्याशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान,- एम.टेक : रसायन अभियांत्रिकी, बी.टेक रसायन तंत्रज्ञान- बी.होक/ एम.व्होक : इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, ऑटोमोबाइ्रल तंत्रज्ञान- एम.बी.ए., एम.सी.ए, एम.टी.एम, मुद्रण तंत्रज्ञान, एलएलएम, एम.कॉम, एम.आय.बी, डी.बी.एम, एम.एफ, ए, एम.ए.एम.सी.जे., एम.एड, एमपीएड, एम.लिब आदी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच मुख्य परिसरात सामाजिक कार्य महाविद्यालय एम.एस.डब्ल्यू अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहेत.

उस्मानाबाद उपपरिसर - एम.एस्सी - सुक्ष्म जीवशास्त्र, रसायनशास्त्र, जैव तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, गणित, जल व भूमी व्यवस्थापन, एम.बी.ए, एम.ए.इंग्रजी, एम.पी.ए व एम.एड आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद