शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

विद्यापीठाला स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानाचा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 7:02 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील अनेक वर्षांपासून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रशासनातर्फे लढ्यात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा विशेष सन्मान केला होता.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील अनेक वर्षांपासून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रशासनातर्फे लढ्यात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा विशेष सन्मान केला होता. मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा सुुरू होती. ती यावर्षी खंडित झाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या जालना जिल्ह्यात एका खाजगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास प्राधान्य दिले. यामुळे स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यापीठात मागील काही वर्षांपासून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त या लढ्यात सहभागी मान्यवर स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्याची परंपरा आहे. प्रत्येक वर्षी पाचपेक्षा अधिक स्वातंत्र्यसैनिकांना बोलावण्यात येते; मात्र यावर्षी राज्यपाल सी. विद्यासागर राव हे गणेश नेत्रालयाचा रौप्य महोत्सव आणि बद्रीनारायण बारवाले यांच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जालन्यात येणार होते. या दोन्ही कार्यक्रमांशी विद्यापीठ प्रशासनाचा दुरान्वयानेही संबंध नाही. तरीही कुलगुरू, प्रकुलगुरूंसह प्रशासन जालन्यात राज्यपालांच्या कार्यक्रमाला हजर राहिले. 

याशिवाय कुलगुरूंच्या आदेशानुसार व्यवस्थापन परिषद सदस्यांनाही राज्यपालांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे विद्यापीठात मागील अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्याची परंपरा खंडित झाली आहे. याबद्दल मराठवाडाप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

कुलगुरूंच्या हस्ते झाले ध्वजारोहणविद्यापीठात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे आदींची उपस्थिती होती. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात येतो. मात्र यावर्षी राज्यपालांच्या कार्यक्रमाला विद्यापीठातील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे ध्वजारोहणानंतर केवळ  कुलगुरू साहेबांचे मार्गदर्शन ठेवले होते.-डॉ. मुस्तजिब खान, विद्यार्थी कल्याण संचालक 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा