विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; उत्तरपत्रिकांची तपासणी ’ऑन स्क्रीन’ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 19:17 IST2025-03-12T19:16:38+5:302025-03-12T19:17:06+5:30

८ एप्रिलपासून पदवी, तर पदव्युत्तरच्या परीक्षा २९ एप्रिल रोजी होणार सुरू

University exam schedule announced; Answer sheets will be checked 'on screen' | विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; उत्तरपत्रिकांची तपासणी ’ऑन स्क्रीन’ होणार

विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; उत्तरपत्रिकांची तपासणी ’ऑन स्क्रीन’ होणार

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तरच्या मार्च-एप्रिलच्या परीक्षांना ८ एप्रिलपासून सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनात परीक्षा विभागाने नियोजन केले आहे. पदवीच्या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू करण्याची आणि ऑनलाइन गुण नोंदणी २४ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान करावी लागणार आहे. त्याशिवाय पदवी अभ्यासक्रमांच्या लेखीपरीक्षांना ८ एप्रिलपासून सुरुवात होणार आहेत. त्याचवेळी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू करण्याची आणि ऑनलाइन गुण नोंदणी १६ ते २६ एप्रिल दरम्यान करावी लागेल. तसेच पदव्युत्तरच्या लेखी परीक्षांना २९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू करण्याची व ऑनलाइन गुण नोंदणी दि. १६ ते ३० एप्रिल यादरम्यान होईल. तसेच लेखीपरीक्षांना ६ मेपासून सुरुवात होणार असल्याचेही संचालक डॉ. भारती गवळी यांनी सांगितले.

उत्तरपत्रिकांची तपासणी ’ऑन स्क्रीन’ होणार
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या सर्व संलग्नित विधि, औषधीनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी व विज्ञान पदव्युत्तर महाविद्यालयातील परीक्षार्थींना त्यांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन प्रक्रियेद्वारेचे आवेदनपत्र सादर सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी विहित शुल्क भरून विद्यापीठाकडे प्राप्त ऑनलाइन परीक्षार्थींच्या अर्जांची छाननी करून महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये स्कॅन पीडीएफ उत्तरपत्रिका पाठविण्यात येतील. परीक्षार्थींनी त्यांना प्राप्त उत्तरपत्रिकेसंदर्भातील आपले आक्षेप संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्य, संचालकांमार्फत विद्यापीठाकडे ऑनलाइन पद्धतीने सादर केल्यानंतर प्राप्त आक्षेपांच्या उत्तरपत्रिका ऑनस्क्रीन पूर्नमूल्यांकन केले जाणार असल्याचेही संचालक डॉ. भारती गवळी यांनी सांगितले.

Web Title: University exam schedule announced; Answer sheets will be checked 'on screen'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.