शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ कर्मचाऱ्यांनाही आता आगाऊ वेतनवाढ

By admin | Updated: December 16, 2014 01:08 IST

औरंगाबाद : शासकीय सेवेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांप्रमाणे आता विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना

औरंगाबाद : शासकीय सेवेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांप्रमाणे आता विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या अत्युत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्याची ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे.यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग, तसेच उस्मानाबाद उपकेंद्राला एक परिपत्रक जारी केले आहे. आगाऊ वेतनवाढ ही २०१२, २०१३ आणि २०१४ या तीन वर्षांसाठी प्रस्तावित आहे. त्यासाठी विद्यापीठातील विविध विभाग व संलग्नित महाविद्यालयांमध्ये कार्यरत वर्ग-१, २, ३ व ४ कर्मचाऱ्यांपैकी ज्याचे काम अत्युत्कृष्ट आहे, अशा दोन कर्मचाऱ्यांची नावे कुलसचिव डॉ. धनराज माने यांच्या कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. नावांची शिफारस ही अत्यंत गोपनीय ठेवण्याची सूचनाही कुलसचिव कार्यालयाने केली आहे. कुलसचिवांकडे प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शिफारसी एकत्रितपणे उच्च शिक्षण विभागाकडे सादर केल्या जाणार आहेत. दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ४आगाऊ वेतनवाढीचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची आजपर्यंतची सेवा, त्यांच्या वेतनश्रेणीतील वेतन हे कोणत्या टप्प्यावर आहे, एखाद्या कर्मचाऱ्यास १ आॅक्टोबरपूर्वी पदोन्नती मिळाली असेल व त्याचे पदोन्नती मिळण्यापूर्वीचे काम अत्यंत चांगले असेल, अशाच कर्मचाऱ्यांच्या नावांची शिफारस स्वीकारली जाणार आहे. ४संबंधित विभागप्रमुख अथवा प्राचार्यांनी कर्मचाऱ्यांच्या नावाची शिफारस करताना कर्मचाऱ्याने बजावलेल्या नावीन्यपूर्ण कार्याबद्दल दोन परिच्छेदामध्ये लिहून पाठविणे बंधनकारक आहे.